मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 1 मार्च 2025 (14:24 IST)

केळवण आणि ग्रहमख

grahmakh kelvan
लग्न ठरल्यावर लग्नाच्या काही दिवसांपूर्वी मुला आणि मुलीचे नातेवाईक मुला आणि मुलीला घरी जेवण्यासाठी बोलावतात. मुलाचे नातेवाईक मुलाला जेवायला बोलवून त्याच्या समोर पाट मांडून रांगोळी काढून समोर समई लावून गोडधोडाचे जेवण करतात. अशा प्रकारेच मुलीचे आणि मुलाचे केळवण केले जाते.
मुंज, लग्न या सारख्या मंगलकार्याच्या आधी ग्रहमख विधि करण्याची पद्धत आहे. या विधि मध्ये मंगलकार्याला नवग्रहाला शांति मिळवणे हाच उद्देश्य असतो. हा विधि लग्नाच्या चार दिवसांपूर्वी घरीच केला जातो. ह्या दिवशी नवरी मुलीला चूड़ा भरला जातो. केळवण म्हणजे वर किवा वधूला लग्नाअगोदर दिलेली जाणारी मेजवानी.
विवाहपूर्वी योग्य दिवस पाहून हा धार्मिक विधि केला जातो. 
घराच्या मुख्य दारावर गणपतीचे चित्र व तोरण लावले जाते. कार्य योग्य रीतीने पार पडण्यासाठी ग्रहांची शांति करण्यासाठी ग्रहयज्ञ करतात. त्यासाठी लागणारी तयारी तयारी आणि दिवस गुरुजींना विचारुन करतात.
 
स्वयंपाकासाठी जेवण घरी केले जाते. गव्हल्याची  खीर , पुरण, लाडू, करंजी, मोदक तसेच मुहूर्त वड्यातील वडाचा उपयोग जेवणाच्या पदार्थात त्या दिवशी केला जातो.
रांगोळी काढून वधु किवा वराला महीरप काढून वधु वराचे आईवडिल, जवळच्या नातेवाईकांना एकत्र जेवण करणे म्हणजे केळवण. 
Edited By - Priya Dixit