मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (12:17 IST)

24 फेब्रुवारी नागेश्वर पंचमी Nageshwar Panchami 2023

nageshwar
या वर्षी नागेश्वर पंचमी 24 फेब्रुवारी शुक्रवार रोजी आहे. शास्त्राप्रमाणे फाल्गुन महिन्यातील या पंचमीला शिवाच्या नागेश्वर रूपाची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या पाच दिवसानंतर ही तिथी येत असून या दिवशी शिवपूजेचा विशेष दिवस मानला जातो. 
 
भाविक या दिवशी नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. या दिवशी नागेश्वराचे दर्शन घेतल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात असे मानले जाते.
 
ग्रंथाप्रमाणे येथे द्वारकाधीश श्री कृष्ण देखील शिवाचा रुद्राभिषेक करत असत. येथे भाविक चांदीचे नाग अर्पण करतात. असे मानले जाते की येथे शिवाची पूजा केल्याने मन आणि शरीर विषमुक्त होते. नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर, जो व्यक्ती त्याच्या उत्पत्ती आणि महानतेशी संबंधित कथा ऐकतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि सर्व भौतिक आणि आध्यात्मिक सुखांची प्राप्ती करतो.