मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (08:23 IST)

Vinayak Chaturthi 2023 विनायक चतुर्थीला करा हे उपाय, संपत्तीत वाढ होईल

ganpati
विनायक चतुर्थीला हे उपाय करा
 
व्यवसायात नफ्यासाठी
चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच 5 गुंठ हळद अर्पण करा. यासोबत श्री गणाधिपतये नमः मंत्र उच्चारला. पुढील 10 दिवस हे करा. असे केल्याने धनात वृद्धी होईल आणि नोकरीत पदोन्नती होईल असे मानले जाते.
 
पैसे मिळवण्यासाठी
विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा करण्यासोबत ऊँ हस्ति पिशाचिनी लिखे स्वाहा या मंत्राचा जप करा. असे केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
 
संकटातून बाहेर पडण्यासाठी
जीवनातील प्रत्येक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रीगणेशाची पूजा करणे आणि शेंदुर लावून तिलक लावणे शुभ राहील. गणपतीला शेंदुरी टिळा लावताना या मंत्राचा जप करावा - 'सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्॥'
 
प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी 21 गुळाच्या गोळ्या बनवा आणि त्या दुर्वा सोबत गणपतीला अर्पण करा. असे केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो.