काय आपण देखील चुकीच्या पद्धतीने करत आहात उपवास

fasting
भारतात उपवास करण्याची प्रथा अत्यंत जुनी आणि महत्त्वाची आहे. परंतू उपवास या शब्दाचा खरा अर्थ लोकं विसरत चालले आहेत. उपवास याचा शाब्दिक अर्थ बघायला गेलो तरी उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. अर्थात जवळ राहणे. अर्थातच देवासाठी केला जाणार्‍या उपवास याचा अर्थ आहे देवाच्या जवळ राहणे.

आजच्या परिस्थितीत याचा अनर्थ झाला असून उपवासाच्या नावाखाली वाटेल ते पदार्थ पोटात ढकले जातात. किंवा एक वेळ जेवण्याची पद्धत असल्यास त्या एक वेळ दोन-तीन वेळाची भर काढणे अगदी सामान्य आहे.

खरं तर उपवासाची उत्पत्ती एखाद्या ठराविक दिवशी मानसिक रूपाने देवाला नमन करण्याची अर्थातच देवाच्या जवळ राहण्यासाठी या हिशोबाने करण्यात आली असावी. खूप काळापूर्वी एकादशी, शिवरात्री, पौर्णिमा अशा दिवशी आपल्या दररोजच्या कामातून विश्रांती घेऊन देवासाठी काही काळ काढावा अशी योजना असावी. जसे शेतकरी, व्यापारी दररोजच्या धावपळीत देवाला आभार मानण्यासाठी वेळ नसल्यामुळे तसंच एखादा दिवस कुटुंबासह वेळ घालवायचा या विचारासह उपवास करणे सुरू केले गेले असावे. तेव्हा उपवास म्हणजे उपाशी राहून देवाचे नाव जपत राहावे अशी कल्पना नसेल तरी पुरुष मंडळी घरात असताना बायकांना स्वयंपाकघरापासून मुक्ती मिळणार तशी कशी म्हणून सर्वांनी उपाशी राहून देवाची आराधना करावी असा ठराव झाला असावा.
नंतर यामुळे शरीराला एक दिवस आराम मिळाल्याने शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडून जाता. अर्थात हे लाभदायकच आहे. अशात तेव्हा उपवास म्हणजे न शिजवलेले पदार्थ ग्रहण करणे असा होता. त्यात पाणी, दूध, फळं यांचा समावेश होता. एकूण हा दिवस कामांमध्ये व्यर्थ न घालवता, न शिजवता खाऊ शकणारे पदार्थ ग्रहण करून, देवाची भक्ती करायची असा होता. त्यात मनोरंजनाला देखील स्थान नव्हते.

पण आजच्या परिस्थितीत पोट भर तेलकट, तुपकट, गोड पदार्थ खाल्ल्यावर उपवास करणार्‍याला भक्ती करताना झोप येणे तर निश्चित आहे. म्हणून खर्‍या अर्थाने उपवास म्हणजे सात्त्विक पदार्थ खाऊन देवाची भक्ती करणे. त्या काळच्या मनोरंजनाचे साधन वेगळे आणि आताचे वेगळे म्हणजे आजच्या तारखेला उपवास करायचा म्हणजे भक्ती, ध्यान करताना हातात मोबाईल नसावा तर तो खरा उपवास धरायला हवा. मोबाइल, टीव्हीपासून लांब राहून देवाची भक्ती केल्यास उपवास नाही तर हल्ली बाजारात उपलब्ध शेकडो प्रकाराचे पदार्थ खाऊन उपवास करणे स्वत:ला धोक्यात ठेवण्यासारखे आहे. उलट हे पदार्थ इतर दिवसात खाल्ल्या जाणार्‍या पौष्टिक पदार्थांपेक्षा अधिक हानिकारक ठरू शकतात.
म्हणून मनोभावे उपवास करून देवाची भक्ती करायची इच्छा असेल तर हे नियम पाळावे:

उपवासाच्या एका दिवस आधीपासून गरिष्ठ भोजनाचा त्याग करावा.

उपवासाचा दिवस सोप्या पद्धतीने घालवावा.

उपवासाच्या दिवशी ध्यान करावं.

या दिवशी चुकून क्रोध करणे, चुगली करणे, दुसर्‍यांचे मन दुखवणे टाळावे कारण मन शुद्ध नसल्यास भक्ती होणार तरी कशी.
उपवासाला फळं -दूध घेणे उत्तम ठरेल.

उपवासाच्या दिवशी अधिक प्रमाणात पाणी प्यावं.

कमजोरी जाणवत असल्यास लिंबू- पाणी पिणे योग्य ठरेल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

Holi 2020 : यंदा होळीच्या शुभ मुहूर्तात करा हे 5 सोपे उपाय

Holi 2020 : यंदा होळीच्या शुभ मुहूर्तात करा हे 5 सोपे उपाय
होलिका दहन शुभ मुहूर्त दिनांक: 9 मार्च 2020 संध्याकाळी: 06:22 ते 08:49 ...

होलाष्टक कथा, काय करावे या दरम्यान जाणून घ्या

होलाष्टक कथा, काय करावे या दरम्यान जाणून घ्या
होळीच्या आठ दिवसांपूर्वी होलिका पूजन करत असणार्‍या ठिकाणी गंगाजल टाकून ती जागा शुद्ध ...

सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल

सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल
हिंदू शास्त्रानुसार या 5 गोष्टी सूर्यास्तानंतर करू नयेत. पौराणिक कथा व ज्योतिषशास्त्रात ...

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते ...

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते पौर्णिमा दोष
होलाष्टक 2 मार्च ते 9 मार्च पर्यंत राहील. या दरम्यान शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाही. ...

भक्त प्रल्हादाची कथा

भक्त प्रल्हादाची कथा
हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या ...

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...