घरात तुळस लावली आहे हे नियम लक्षात ठेवा
सनातन धर्मात तुळस ही अतिशय पूजनीय मानली आहे. ही केवळ पूजेसाठीच नव्हे तर औषधी गुणधर्मासाठी देखील महत्त्वाची आहे. तुळशीचे गुणधर्म औषधी आहे. घरात हे लावणे शुभ मानले जाते. आजच्या काळात माणसाच्या राहणीमान आणि घराच्या रचनेत बदल झाला आहे,तरी ही तुळशीला तितकेच महत्त्व आहे. घरात तुळस लावणे फायदेशीर आहे. म्हणून आपल्या घरात तुळस आवर्जून लावावी.पण हे लावण्यासाठी काही नियम असतात चला तर मग काय आहे ते नियम जाणून घेऊ या.
हिंदू धर्मात प्रत्येक धार्मिक कार्यात तुळस वापरतात. तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. भगवान विष्णूंच्या पूजेत कोणत्याही प्रकारच्या तामसिक वस्तूंना वापरण्यास मनाई आहे, तुळस देखील खूप पावित्र्य आहे, म्हणून ज्या ठिकाणी तुळस लावली आहे त्या ठिकाणी मद्यपान, मांसाहार करू नका. तुळशीची माळ गळ्यात घालणाऱ्यांनी कधीही तामसिक वस्तूंचे सेवन करू नये. किंवा मादक पदार्थ घेऊ नये.
घरात तुळस लावल्याने वास्तुदोष असल्यास तो नाहीसा होतो आणि घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा पसरते. वास्तुनुसार तुळशीचे झाड नेहमी पूर्वोत्तर किंवा उत्तरेकडील भागात लावावी. मोठे घर असल्यास आणि योग्य जागा असल्यास तुळस नेहमी घराच्या मध्य भागी ठेवा. हे नेहमी चांगले परिणाम देते. तुळशीची लागवड करताना हे लक्षात ठेवा की ह्याला कधीही दक्षिणेकडे ठेवू नये. असं करणे अशुभ असत.
घरात तुळस लावल्यावर तिची खूप काळजी घेणं महत्त्वाचे आहे. तुळशीला नियमानं पाणी द्यावं आणि संध्याकाळी साजूक तुपाचा दिवा लावावा. तुळशीपुढे दिवा लावताना नेहमी दिव्याखाली तांदूळ ठेवावे. ज्या घरात दररोज तुळशी समोर सकाळ संध्याकाळ दिवा लावतात त्या घरात नेहमी लक्ष्मीची कृपा असते. त्या घरात सौख्य आणि समृद्धीची भरभराट होते. रविवारी तुळशीला पाणी देऊ नये.
काही घरात तुळस जमिनीत लावतात, असं करू नये तुळशीचं रोपटं नेहमी कुंडीत लावावी. असे मानतात की जर तुळस जमिनीवर लावली तर ती अशुभ परिणाम देते. घरातील सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट प्रभाव पडतो.
काही विशिष्ट तिथींना तुळस तोडणे वर्जित मानले आहे, रविवारी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, एकादशी आणि सूर्यास्तच्या वेळी तुळस तोडू नये. जर आपल्याला कधी या दिवसात तोडावयाची असल्यास सर्वप्रथम तुळशीला हात जोडून नमस्कार करा नंतर तुळशीची पाने काढा. तुळशीची पाने विनाकारण तोडू नये.
आपण घरात तुळस लावलेली असेल तर त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचे आहेत. त्याला नियमानं पाणी द्या जेणे करून ती सुकू नये.अंघोळी शिवाय कधीही तुळस स्पर्श करू नये. असे म्हणतात की स्त्रियांच्या चार दिवसात म्हणजे मासिक पाळी असताना तुळशीला स्पर्श करू नये. तुळस भोवती स्वच्छतेची काळजी घ्यावी. घरातील तुळस सुकल्यावर त्यात नवीन तुळस लावा. सुकलेल्या कांड्यांना तसेच फेकून देऊ नये. त्यांना योग्यरीत्या पाण्यात प्रवाहित करावं.