1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ३०

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगजासुर शिरच्छेत्रे नमः ॥
जयजयाजी जगदीश्‍वरा विश्‍वचाळका विश्‍वंभरा त्रैलोक्य लावण्य सुदरा ब्रह्मानंदा सुखाब्धी ॥१॥
तुझें नामामृतपान करितां चुके जन्ममरण संसारीं जना संकट विघ्न न बाधे जाण सर्वथा ॥२॥
तुझें नाम जपतां वाणी सीतळ जाला त्रिशूळपाणी नाम घेतां गणिका कुंठ्ठीणी वैकुंठ भुवनीं पातली ॥३॥
नामेंच वाला कोळी तरला पापी अजामीळ उत्धरला नामाचा प्रताप आगळा श्रेष्ठीं वर्णिला पुराणीं ॥४॥
मोक्षप्राप्तीचें कारण नामापरतें नसे साधन नलगे जप तपानुष्ठान नाम तारक सर्वांतें ॥५॥
वेदकल्पतरुचें बीज ते हरीनाम केवळ निज तयाचे अग्रीं सहज हरिनाम फळ असे ॥६॥
आदी अंतीं नाम जाणा तारक असे चहूंवर्णा संध्या श्रात्ध सत्कर्माचरणा करुनि अर्पिती हरीतें ॥७॥
ऐसा श्रीहरी करुणाकर विश्‍वव्यापक विश्‍वोत्धार तयाचे नामीं निरंतर आवडी असो सप्रेमें ॥८॥
महावैष्णव विप्र प्रचीत दोषापासोनि जालामुक्त धर्मातें ह्मणे गंगासुत मागील चरित्र परिसीजे ॥९॥
शुद्ध दशमी मार्गशीर्ष स्नान घडे शाल्य तीर्थास जन्मांतरींचें किल्मिष भस्म होतें सवेंचि ॥१०॥
एकादशीसमे धावती स्नानोपवासें सूर्य लोकप्राप्ती सौध्यपाळ द्वादशी तिथी स्नानें हरती किल्मिषें ॥११॥
दिषे तीर्थ अद्भुतजाण तेथें त्रयोदशीचें करावें स्नान तेणें चुके पुनरागमन मोक्षभुवन प्राप्त होय ॥१२॥
जालिया नरदेहाची प्राप्ती तरी यात्रा करणें दिघेतीर्थीं तयाकारणें उत्तमगती नाहीं मिती पुण्यातें ॥१३॥
तीर्थनाम नाळीकेत जे चतुर्दशीचें स्नान करीत तयाचें जन्म सफळ होत पुन्हा नाळीत न येती ॥१४॥
पौर्णिमा शिळा तीर्थीस्नान वैतरणी करावें पिंडदान आणीक देतां ब्राह्मण भोजन पितृगण संतोषती ॥१५॥
कृष्ण प्रतीपदा उगवतां दिवस स्नान रुद्राळे तीर्थास करितां हरती महादोष रुद्रलोक प्राप्त होय ॥१६॥
बिल्वफाळे तीर्थविशेष द्वितीये स्नानें हरे दोष तृतीया त्रुटी तीर्थास स्नानें पुण्य गोकोटी ॥१७॥
चतुर्थी विनायकतीर्थीं स्नान मात्रें दोष हरती नागकुंडीं पंचमी तिथी स्नानदान करावें ॥१८॥
अश्‍वमेघ सोमयाग घडे पुण्य अक्षय चांग संसाराची फिटे पांग स्वर्गभुवन प्राप्त होय ॥१९॥
कुश व्याधात तीर्थाप्रती षष्ठी जे नर स्नान करिती तयांलागीं निर्जरपती सन्निध बैसवी आपुले ॥२०॥
सप्तमी तिथी ब्रह्मालय स्नानें ****तूचें पुण्य होय देव कुंडतीर्थ पाहे अष्टमी स्नानें शुत्धता ॥२१॥
ते नर सार्वभौम होती पुढें महात्म्य नवमी तिथी कुंडेश्‍वरीं स्नान करिती ते होती पुत्रवंत ॥२२॥
दशमी सोमतीर्थी स्नान करितां नरहोती चंद्रवदन तेथें देतां ब्राह्मण भोजन त्या पुण्यातें पार नसे ॥२३॥
चंद्रें शरीर प्रक्षाळिलें ह्मणोनि सोमतीर्थ नाम पावलें तेथींचें महात्म्य आगळें असे वर्णिलें पुराणीं ॥२४॥
एकादशी तीर्थ भगवती स्नानें यम लोक वर्जिती विष्णुलोकाते पावती नारीनर निःशेष ॥२५॥
आतां द्वादशी महापर्वणी स्नान करावें विमळ वरुणी मध्यदेशीं चक्रपाणी दर्शन त्याचें घेईजे ॥२६॥
ते नर विमानारुढ होती मोक्षपदाप्रती जाती त्रयोदशी रुद्रतीर्थीं स्नानें पावती रुद्रलोका ॥२७॥
चतुर्दशी चंडिकातीर्थी जयातें तिन्ही लोक वंदिती नारी नरातें प्राप्त मुक्ती स्नान मात्रें करोनियां ॥२८॥
अमावास्या तिथी ताम्रालया स्नानें पातकें जाती लया पितृश्रात्ध करितां गया तुल्य तोषती पितृगण ॥२९॥
आणिक ब्राह्मण भोजनें करिती निपुत्रिकातें पुत्र संतती धनधान्य वृत्धी पावती मुक्त होती ऋणत्रया ॥३०॥
ऐसा संपला मार्गशीर्ष उगवता जाला पौषमास स्नान पुरातन तीर्थास करितां विघ्नें नासती ॥३१॥
सर्व पाप क्षय होत अंतीं रुद्र लोकप्राप्त पुढें अर्घ्य पादतीर्थ स्नान द्वितीयेसीं साधावें ॥३२॥
तयासी द्रव्य लाभ होय सर्व दारिर्‍द्य विलया जाय तृतीया तिथी होतां उदय यागतीर्थीं स्नान विधी ॥३३॥
पाळ पंजरावरी जाण करावें तंदूळ वस्त्रदान महत्पातका होय दहन वर्धमान पुण्य होय ॥३४॥
चतुर्थी स्नान कनखळें करुनि अर्पावीं नारि केळें चणक धान्यें नानाफळें द्विजांलागीं अर्पावीं ॥३५॥
तया स्थळीं महांकाळेश्‍वरी पूजावी यथासांग कुमारी करकोदरें विप्राकरीं चंदन कुंकुम समर्पावें ॥३६॥
नाना वाद्य कीर्तन विप्रमुखें वेदपठण प्रदक्षिणा करुनि जाण ब्राह्मण संतर्पण करावें ॥३७॥
महापातका होय दहन संतती संपत्ती वर्धमान विष्णुदूत आणिती विमान वाहोनि नेती निजपदा ॥३८॥
पंचमी द्रोणतीर्थी स्नान करुनि अर्पिजे नीळद्रोण स्वर्गीं अयुतशत वर्षें जाण अक्षय वास घडतसे ॥३९॥
षष्ठी स्नान कर्णतीर्थीं करितां नर धनाढ्य होती विप्रकुळीं जन्मा येती होती वेद पारायण ॥४०॥
अग्निकुंडीं सप्तमी तिथी स्नानें महादोष जळती स्वर्गलोकीं अक्षयवस्ती प्राणियांसी होय पैं ॥४१॥
अष्टमी भगवती तीर्थीं स्नानमात्रें होय मुक्ती नवमी गज कुंडाप्रती स्नानें गणपती संतोषे ॥४२॥
विघ्नें नासोनि कार्यसित्धी विद्या प्रगटे प्रसरे बुत्धी घरीं राहती नवनिधी प्रिया होती सौभाग्यता ॥४३॥
दशमी उतळेश्‍वर परम स्नान करितां पातकें भस्म एकादसी स्नानोत्तम इंद्रायणीं करावें ॥४४
आरोग्य होती नारीनर द्वादशी विमळावर तेथें तीर्थ दामोदर स्नान दान करावें ॥४५॥
सर्वपाप क्षय होत तिथी त्रयोदशी होतां प्राप्त महास्थान नंदिका तीर्थ स्नानें हरती पातकें ॥४६॥
लवण तीर्थीं चतुर्दशी स्नानें गती नारी नरासी अक्षयपद स्वर्गवासी अचळ ध्रुवासारिखें ॥४७॥
पौर्णिमा या शीळातीर्थीं नारी नर स्नानें करिती धनधान्यें विपुळ होती गती पावती उत्तम ॥४८॥
भीष्म ह्मणे परशुरामें मुनींस निवेदिलें अनुक्रमें त्या तीर्थावळी सप्रेमें तुजलागीं सांगीतल्या ॥४९॥
तरी यथानुक्रमें करुन तीर्थीं करावें स्नानदान शेवटीं वैतरणी येऊन श्रीएकवीरा पूजावी ॥५०॥
त्रिभुवनींचें तीर्थाटण केले कोटि विष्णुलिंगाचें दर्शन कल्पवरुषें वास जाण प्रयाग तीर्था प्रती केला ॥५१॥
शतमखांचें घडलें पुण्य मेरुतुल्य सुवर्णदान घेतां एकवीरेचें दर्शन येव्हढें फळ प्राप्त होय ॥५२॥
जीचे उदरीं साक्षात भगवान ॥ आनादी ईश्‍वर नारायण आले तीयेचें दर्शन महान असे त्रिजगतीं ॥५३॥
तीराम मातोश्री रेणुका आदिशक्ती श्रीचंडिका जगदीश्‍वरी महांकाळिका जगदंबिका महामाया ॥५४॥
ते परब्रह्म परंज्योती परात्पर आदिमूर्ती निर्गुणातें सगुण करिती संध्या गायत्री त्रिपदातें ॥५५॥
तिचें घेऊनि दर्शन तेथें करावें उद्यापन श्रीफळ विडा घेऊन प्रदक्षिणेसीं निघावें ॥५६॥
सव्य घालूनि विमळ वरुण करावें साष्टांग नमन ह्मणावें मातेव्रत संपूर्ण नारायण प्रीति पावो ॥५७॥
यथासांग ब्राह्मण भोजन तये स्थानीं करावें जाण विडा दक्षणा देऊन वैष्णव जन पूजावे ॥५८॥
सद्भाव धरुनि अंतःकर्णी ऐसें व्रत जो आचरे प्राणी त्यातें विष्णुदूत विमानीं वाहूनि नेती वैकुंठा ॥५९॥
आणीक जी जयाची आर्त तैसें तयासी फळ प्राप्त अंधासी नेत्र प्रकाशवंत पांगुळा होय धांवता ॥६०॥
महासंकटें निरसोनि जाती निर्धना होय द्रव्यप्राप्ती निपुत्रिकातें पुत्र संतती मुके होती वाचक ॥६१॥
बधिरातें श्रवण होय महारोगातें होतसे क्षय शत्रु पावती पराजय राजद्वारीं विजय लाभ ॥६२॥
जरी न घडे इतुकें साधन तरी हें करावें पठण तया कारणें नारायण तुष्टोनी फळ देतसे ॥६३॥
एवं अष्टोत्तर तीर्थें भीष्में सांगीतलीं धर्मातें ह्मणे आणीक श्रवणातें इच्छा तूतें सांग पा ॥६४॥
ऐसें हें विमळ वैतरणी कथन येथोनि जालें संपूर्ण पद्म पुराणींचें उत्तमोत्तम वर्णन केलें यथामती ॥६५॥
सूत ह्मणे शौनकातें ऐका परशुराम कथेतें धर्मराव पुसे भीष्मातें मातें तृप्तता न होय ॥६६॥
स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु त्रिंशोध्याय गोड हा ॥३०॥श्रीमधुकैठभमर्दनार्पणमस्तु॥