शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

घरात श्रीयंत्र ठेवत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या

लक्ष्मीचे प्रिय यंत्र आहे श्रीयंत्र. असे म्हटले जाते की श्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मीची विशेष कृता प्राप्त होते. घरात 
विधि-विधानाने श्रीयंत्राची पूजा केली तर घरात सुख संपत्ती, सौभाग्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. पण याची स्थापना आणि पूजा करण्यासाठी बर्‍याच गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. काही अशा गोष्टी आहे ज्या श्रीयंत्राची स्थापना करण्याअगोदर तुम्हाला लक्षात  ठेवायला पाहिजे.  
 
* श्री यंत्राला जर घरात स्थापित करत आहात तर शुभ मुहुर्त बघून स्थापित केले पाहिजे.  
* जर घरात श्रीयंत्र ठेवत असाल तर देव समजून त्याची पूजा केली पाहिजे.  
* घरात श्रीयंत्र स्थापित करत असाल तर घरात अल्कोहल, मटण आणि अभद्र भाषेचा वापर करू नये. असे केल्याने श्रीयंत्राकडून मिळणारा फायदा तुम्हाला मिळत नाही.  
*या गोष्टीकडे लक्ष ठेवा की श्रीयंत्र योग्य प्रकारे बनलेले आहे की नाही, चुकीच्या श्रीयंत्राची पूजा केल्याने कुठलेही लाभ मिळत नाही. 
*एकदा श्री यंत्राला स्थापित केल्यानंतर रोज त्याचा जाप केला पाहिजे. जर घरात श्रीयंत्राला ठेवले तर त्याची पूजा नक्की करायला पाहिजे. याची पूजा न केल्याने त्याचे नकारात्मक प्रभाव देखील दिसून येतात.