रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

प्रवास शुभ आणि यशस्वी व्हावा यासाठी मंगल उपाय

हॅपी जर्नी, आपला प्रवास सुखाचा घडो असे सुंदर वाक्य कोणीही प्रवास करत असलेल्या व्यक्तीला शुभेच्छा म्हणून दिल्या जातात ज्याने करुन प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि ज्या कामासाठी केला जातं आहे ते काम यशस्वीपणे पार पडावे अशी भावना असते. तसेच वृद्ध लोकांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहे ज्या प्रवास करण्यापूर्वी आवश्यक लक्षात घेतल्या पाहिजे. तर जाणून घ्या त्या गोष्टी: 
 
* घरातून निघण्यापूर्वी देवघरात 11 उदबत्त्या आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा. कुंकू, हळद, अबीर, गुलाल, अक्षता आणि फुलं ताटात ठेवून आरती केली पाहिजे. देवाकडे सकुशल प्रवासाची कामना केली पाहिजे. नंतर काळे तीळ स्वत:वरुन सात वेळा ओवाळून उत्तर दिशेकडे फेकून द्यावे.
 
* प्रवास ठरवण्याआधी आणि प्रवासासाठी बाहेर निघताना शुभ चौघडि़या बघणे योग्य ठरेल.
 
* घरातून निघताना काही शब्दांचे उच्चारण वर्जित आहे- जसे जोडे, चपला, लाकूड, शिवीगाळ, ताळा, रावण, दगड, नाही, मरण, बुडणे, फेकणे, सोडणे, किंवा असेच नकारात्मक शब्द.
 
* थट्टा म्हणून देखील प्रवासात नदी, आग आणि वायू याबद्दल अपमानजनक शब्द वापरू नये. ईश्वरच्या पवित्र देणगीवर कधीच विनोद करू नये.
 
* निघताना शुभ शब्द, पवित्र मंत्र आणि मंगलवचन प्रयोग करावे. प्रसन्न मनाने प्रवासाला निघावे. वाद, कटकटी, अश्रू टाळावे. 
 
* घरातून निघण्यापूर्वी अक्षतांवर कळश ठेवावे आणि त्यावर सव्वा रुपया ठेवून उदबत्तीने आरती करून प्रवास निर्विघ्न पार पडावा अशी प्रार्थना करावी. घरी परत आल्यावर रुपया, अक्षता आणि पाणी महादेवाच्या मंदिरात अर्पित करावे.
 
* घरातून निघण्यापूर्वी मुंग्यांना कणीक टाकावी, पक्ष्यांना दाणा-पाणी द्यावे, काळ्या कुत्र्याला पोळी आणि गायीला भिजलेलं धान्य खाऊ घालावे.
 
* घरातील जवळीक मंदिरात नारळ अर्पित करावे. काही पैसे दान पेटीत टाकण्याऐवजी मंदिरात लपवून ठेवावे. याला गुप्त दान म्हणतात. प्रवास सुखाचा घडावा यासाठी हा फलदायी उपाय आहे.
 
* प्रवासापूर्वी एका मध्यम आकाराच्या डब्यात डाळ, तांदूळ, कणीक, साखर, फळ, फुलं आणि मिठाई ठेवा. प्रवासातून परत आल्यावर ब्राह्मणाला हे पदार्थ दान द्यावे.