1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 3 मार्च 2025 (08:19 IST)

Vinayak Chaturthi Wishes in Marathi विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

ganesha doob grass
सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाव
सोपे होईल सर्व काम
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा
 
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रम्य ते रूप,
सगुण साकार मनी दाटे भाव
पाहता क्षणभर अंतरंगी 
भरूनी येत असे गहीवर
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा 
 
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा 
 
श्रीगणेशाच्या दिव्य उपस्थितीने
तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदो
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा 
 
तुमचे जीवन उत्तम आरोग्य,
समृद्धी आणि यशाने भरले जावो
हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा 
 
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा 
 
तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा