गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

कोणी लिहिली 'रामायण'

अशी मान्यता आहे की सर्वप्रथम श्रीरामाची कथा महादेवाने पार्वतीला सांगितली होती. त्या कथेला एका कावळ्याने ऐकले होते आणि त्याच कावळ्याने पुढील जन्मात कागभुशुण्डिच्या रूपात जन्म घेतला. काकभुशुण्डिला पूर्व जन्मात महादेवाच्या मुखाने ऐकलेली रामकथा पूर्ण पाठ होती. 
 
त्यांनी ही कथा आपल्या शिष्यांना सांगितली. या प्रकारे रामकथेचा प्रचार प्रसार झाला. महादेवाच्या मुखाने निघालेली श्रीरामाची ही पवित्र कथा 'अध्यात्म रामायण'च्या नावाने विख्यात आहे. 
 
पण रामायणाच्या बाबतीत एक मत अजून प्रचलित आहे म्हणजे सर्वात आधी रामायण हनुमानाने लिहिली होती, नंतर महर्षी वाल्मीकीने संस्कृत महाकाव्य 'रामायण'ची रचना केली होती. रामायणानंतर श्रीराम कथेला बर्‍याच भाषेत रामायण किंवा याच्या समकक्ष नावांनी लिहिण्यात आले. हनुमानाने याला शिलेवर लिहिले होते. ही रामकथा वाल्मीकीच्या रामायणाच्या अगोदर लिहिण्यात आली होती आणि 'हनुमन्नाटक'च्या नावाने प्रसिद्ध आहे. या प्रकारे श्रीराम आज देखील जगात बर्‍याच रामायणाच्या माध्यमाने जिवंत आहे आणि नेहमी राहतील. 
 
रामायणात श्रीराम कथा 
या प्रकारे वेग वेगळ्या वेळेत बर्‍याच रामायण लिहिण्यात आल्या. या सर्व रामायणात श्रीराम कथेत काही न काही बदल करण्यात आला. या सर्व रामायण ग्रंथात रामाबद्दलचे असे प्रसंग आढळतात जे मूल वाल्मीकी रामायणात नाही आहे. म्हणून महर्षी वाल्मीकी रामायणालाच मूल रामायण मानण्यात आले आहे. 
 
वाल्मीकी रामायण आणि इतर रामायणात जे अंतर बघण्यात आले आहे ते वाल्मीकी रामायणाला तथ्य आणि प्रसंगांच्या आधारावर लिहिण्यात आले होते, जेव्हाकी रामायणाला जनश्रु‍तीच्या आधारावर लिहिण्यात आले आहे. 
 
उदाहरण म्हणजे बुद्धाने आपल्या पूर्व जन्माचे वृत्तांत म्हणत आपल्या शिष्यांना रामकथा ऐकवली होती. बुद्धानंतर गोस्वामी तुलसीदासने  रामकथेला श्रीरामचरितमानसच्या नावाने अवधीत लिहिले. अशा प्रकारे जनश्रुतिच्या आधारावर प्रत्येक देशाने आपली रामायण लिहिली आहे. 
 
रामायण अद्याप अन्नामी, बाली, बंगला, कम्बोडियाई, चीनी, गुजराती, जावाई, काश्मिरी, खोटानी, लाओसी, मलेशियाई, मराठी, ओडिया, प्राकृत, संस्कृत, संथाली, सिंहली, तमिळ, तेलगू, थाई, तिंबती, कावी इत्यादी भाषांमध्ये लिहिण्यात आली आहे.