शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

आकड्याचा गणपती मनोकामना पूर्ण करतो

ज्या घरात आकड्याच्या गणपतीची पूजा करण्यात येते तेथे दारिद्य्र, गरिबी, रोग आणि कष्ट दूर होऊन धन, ऐश्वर्य आणि यश मिळते. अशा घरात सुख समृद्धी नांदू लागते. गणेशोत्सव काळात आकड्याच्या गणपतीची पूजा करणे भाग्याचे असते. यामुळे आपल्या सार्‍या मनोकामना पूर्ण होतात.

झाडाच्या मुळाचा आकडा मिळाल्यानंतर तो स्वच्छ करावा. त्याला स्रान घालावं. लाल कपड्यात ठेवावे. चंदन, अक्षता, लाल फूल, सिंदूर यांनी पूजा करावी. धूप आणि दिवा लावावा. एक नाणे ठेवावे. यानंतर गणेशमंत्रांचा जप करावा. जप लाल माळ किंवा रुद्राक्ष माळेने केल्यास अधिक चांगले.

मंत्र-

ओम गं गणपतये नम:

श्री गणेशाय नम:

ओम भालचन्द्राय नम:

ओम एकदन्ताय नम:

ओम लम्बोदराय नम: