शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

इच्छा कशी उत्पन्न होते?

सुखद अनुभवांची आठवण आणि पूर्व संस्कार यांच्यामुळे इच्छा उत्पन्न होते.
 
काही ऐकून इच्छा उत्पन्न होणची शक्यता असते.
 
विशिष्ट लोक किंवा ठिकाण यांच्या संपर्कातून इच्छेला चालना मिळू शकते.
 
दुसर्‍या कोणाची गरज किंवा इच्छा तुमच्यातून, तुमची स्वत:ची इच्छा म्हणून व्यक्त होऊ शकते. उदा. जेव्हा कोणालातरी भूक लागते तेव्हा त्यांना खाऊ घालण्याची इच्छा तुमच्यात उत्पन्न होते किंवा कोणालातरी तुमच्याशी 
 
बोलायचे असते आणि उत्स्फूर्तपणे तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होते.
 
विधिलिखित किंवा घडणारी घटना, यामध्ये तुम्हाला काही भूमिका करायची आहे तर तेही इच्छेला चालना देऊ शकते. पण तुम्हाला तुमच्या कृतीमागच्या कारणांची जाणीव नसते. 
 
उदा. क्यूबेकमधील एक सद्गृहस्थ कशासाठी करतोय हे माहीत नसताना देखील रस्ते तयार करणे आणि शेतात काम करणे हे 30 वर्षे करत होते. त्या शेतात आपला मॉन्ट्रियल आश्रम होणे हे विधिलिखित होते.
 
श्री श्री रविशंकर 
‘मौन एक उत्सव’ मधून साभार