शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

घरातले देवालय (देवघर)

देवाच्या पूजेची वेळ निश्चित असावी. अगदी पहाटे ब्रह्म मुहूर्तापासून दुपारच्या मध्यप्रहरापूर्वी (पहाटे 3 ते दुपारी 12च्या आधी) पूजेची वेळ शक्यतो नक्की करावी. ईशान्य कोपरा हा देवघरासाठी अतिशय चांगला आहे. पूजा करताना आपले तोंड ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. त्यामुळे आपल्याला सूर्यापासून मिळणशरी ऊर्जा आणि चुंबकीय ऊर्जा मिळते त्यामुळे आपला संपूर्ण दिवस प्रसन्न व उत्साहवर्धक रहातो. देव देवतांची प्रतिष्ठापना करून एकाग्रतेने देवांची पूजा करा. मनात कोणत्याही वाईट विचारांना धारा देऊ नका. दुसर्‍या बद्दल चांगला विचार केलात तर तुमची पूजा देवापर्यंत पोहोचेल आणि देव आपल्याला हजारपटींनी फळ देईल. देवावर पूर्ण विश्वास ठेवलात तर तुमची सगळी दु:ख दूर होतील. 

सद्‍गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतात पण तो गुरु सुद्धा चांगला सगळ्या कसोट्यांवर तपासून, लोकांना विचारुन, त्यांचा विचार घेऊन शंभर टक्के भरवसा ठेवून गेलात तरच आपले कार्य सिद्धीस जाईल.

ND ND  
देवासमोर शांतपणे बसल्याव्र मिळणारे समाधान, त्याचे सानिध्यही आपल्याला पुरेसे आहे. नामस्मरण, धूप दिप ज्या ठिकाणी आहे असे देवघर आपल्या घरात असल्यावर आपण समाधानी होऊच. देवाची आस लगल्यावर घर काय मंदिर काय कुठेही अध्यात्मिक आत्मिक शांती व आनंद मिळेल.

ND ND  
देवमूर्ती, फोटो, मंत्र, पूजापाठ व एकाग्रतेने केलेली साधना ज्या ठिकाणी होते तिथेच आपल्या पूजेचे सार्थक होईल. एका सद्‍गृहस्थाने एवढेच केले तरी त्याच्या घरात सुख शांती नांदेल. देवाची सेवा म्हणून दान-धर्म, गो-सेवा असा भूतदया परोपकार करा.