शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 15 एप्रिल 2015 (15:12 IST)

देवघरात कोणत्या वस्तू कुठे आणि कसे ठेवायला पाहिजे ...

आपण सर्वजण देवघर सुंदर कसे दिसेल याची नेहमीच काळजी घेत असतो पण आम्हाला या बाबींची देखील माहिती असायला हवी की पूजेच्या कामात येणार्‍या वस्तूंना कशा प्रकारे ठेवायला पाहिजे. आमच्या धर्मशास्त्रांमध्ये या बद्दल चर्चा करण्यात आली आहे की देवघरात कोणत्या वस्तूला कोणत्या बाजूला ठेवायला पाहिजे. याची माहिती पुढे देण्यात आली आहे....
 
1. घंटी, उदबत्ती घर आणि पाण्याने भरलेला पात्र डावीकडे ठेवायला पाहिजे.  
(घंटा वामदिश‍स्थ‍िताम्)
 
2. तेलाचा दीवा डावीकडे, आणि तुपाचा दिवा उजवीकडे ठेवायला पाहिजे.  
(घृतदीपो दक्षि‍णतस्तैलदीपस्तु वामत:)  
 
3. पाण्याने भरलेला शंख उजवीकडे ठेवण्याचे विधान आहे.  
 
4. केसर, कापुरासोबत उगाळलेले चंदन पुढे ठेवायला पाहिजे. चंदनाला तांब्याच्या भांड्यात ठेवणे वर्जित आहे. चंदनाचा लेप पातळ नसून थोडा घट्ट असायला पाहिजे.   
 
5. नैवेद्य इत्यादी देवाच्या मूर्ती समोर ठेवायला पाहिजे.  
 
6. शास्त्रात असे सांगण्यात आले आहे की शंखाला पाण्यात डुबवायला नाही पाहिजे आणि जमिनीवर देखील ठेवणे वर्जित आहे.    
 
7. पाण्याला गाळूनच भांड्यात भरून ठेवायला पाहिजे.