शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पंचकामध्ये कुठले शुभ कार्य वर्जित आहे

पंचकाला ज्योतिष शास्त्रात शुभ नक्षत्र मानले जात नाही. याला अशुभ आणि हानिकारक नक्षत्रांचा योग म्हणून ओळखण्यात येतं. नक्षत्रांच्या मिलापामुळे एक विशेष योग निर्माण होतो त्याला पंचक असे म्हणतात. जेव्हा चंद्रमा, कुंभ आणि मीन राशीत असतो, तो योग पंचक म्हणून ओळखला जातो.
याच प्रकारे घनिष्ठा ते रेवती पर्यंत जे पाच नक्षत्र (घनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद व रेवती) असतात, त्याला पंचक म्हणतात.
पंचकाचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडतो :

पंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे योग निर्माण होतात. पूर्वाभाद्रपद रोग कारक नक्षत्र असतो.

उत्तराभाद्रपदांत धनाचा अपव्यय होतो  व रेवती नक्षत्रात धनहानी होण्याची शक्यता असते.

लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी :
पंचकच्या वेळेस जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असतो त्या वेळेस गवत, लाकूड, इंधन इत्यादी एकत्रित नाही करायला पाहिजे, यामुळे अग्नीचा भय असतो.
पंचकाच्या वेळेस दक्षिण दिशेत यात्रा करण्यास टाळायला पाहिजे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये दक्षिण दिशेची यात्रा करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

पंचकात जेव्हा रेवती नक्षत्र असतो, त्या वेळेस घराचे छत छप्पर तयार करण्यास टाळायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धनहानी आणि घरात क्लेश निर्माण होतो. अशी मान्यता आहे की पंचकात पलंग तयार केला तर अधिक क्लेश होतो.

जी सर्वात जास्त प्रचलित मान्यता आहे ती म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची मृत्यू पंचकात झाली असेल तर पंचकात त्याचे क्रियाकर्म केले तर त्या कुटुंबातील किंवा नजीकच्या पाच लोकांचा मृत्यू होणे निश्चित आहे.

काय करावे :
या अवघड स्थितीपासून बचाव करण्यासाठी, शवासोबत पाच पुतळे कणीक किंवा कुश (एका प्रकारचे गवत)ने बनवून अर्थी वर ठेवावे आणि यांचे शवाप्रमाणे पूर्ण विधी-विधानाने अंतिम संस्कार करावे, तर पंचक दोष समाप्त होतो.