शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

भजनी दिंड्यांनी शेगाव फुलले!

पुण्य फळले बहुता दिवसा । भाग्य उदयाचा ठसा ॥ झालो सन्मुख तो कैसा । संत चरण पावलो ॥....... या प्रमाणे संताचे दरबारी आल्यानंतर आपले भाग्य उजळल्याचे समाधान व्यक्त करीत गावोगावीचे वारकरी 'साइ'चे दरबारात भजनी दिंड्याद्वारे हरिनाम घेत दाखल होत आहेत. ''ाइ'च्या प्रकटदिनोत्सवात सहभागी होण्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर फुलून दिसत आहेत. त्यामुळे सर्वत्र 'गण गण गणात बोते' चा नामघोष, टाळमृदंगाचा निनाद, भगव्या पताका दिसून येत असून शेगाव संतनगरी दिंड्यांनी फुलली आहे. त्याचप्रमाणे खामगाव-नांदुरा येथुनही भजनी दिंड्या जातांनाचे चित्र दिसून येत आहे. ''ाइ'च्या समाधी शताब्दी महोत्सवामध्ये मागीलवर्षी प्रकट दिन , रामनवमी व ऋषीपंचमी या तिन्ही उत्सवांमध्ये लहान बालकापासून ते वृध्द वारकर्‍यांना कापडप्रसाद शेगाव संस्थानच्या वतीने देवून यथोचित सन्मान केला होता. तर यावर्षी ''ाइ'च्या 138 व्या प्रकटदिन उत्सवाचे पर्वावर भजनी दिंड्यातील लहान ते वृध्दापर्यंत सर्व वारकर्‍यांना नवीन पादत्राणे शेगाव संस्थानचे वतीने वितरीत करुन वारकर्‍यांची विशेष दखल घेण्यात येत आहे. 

अनेक वारकर्‍यांनी पादत्राणे आणली नाहीत तर अनेकांची पादत्राणे घासलेल्या -फाटलेल्या स्थितीत दिसून आली. या संदर्भात वारकर्‍यांना विचारले असता श्री गजानन महाराज संस्थानलाच आम्हा वारकर्‍यांची काळजी आहे. संस्थानची प्रत्येकवेळी आम्हाला आगळीवेगळी भेट म्हणजे 'साई'चा प्रसाद होय. संस्थानची भेट ही आमच्यासाठी लाखमोलाची असल्याच्या प्रति‍‍क्रिया भक्तांनी व्यक्त केल्यात.

त्याचप्रमाणे आनंद सागर विसावा व आनंद विहार परिसरात वारकर्‍यांच्या निवासासाठी भव्य सभामंडप, विद्युत, पाणी , मोफत दवाखाना, औषधी , भजनी साहित्य दुरुस्तीसाठी अंशदान -अनुदान , महाप्रसाद , पादत्राणे वितरण , स्नानगृह अशी वेगवेगळया व्यवस्थेसाठी विविध विभाग स्थापन करण्यात आले आहेत.वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये याची विशेष दखल घेण्यात येत आहे.