शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रात्री नाही करू घराची साफ- सफाई

अधिकांश घरातील मोठ्या लोकांकडून हे ऐकाला मिळत असेल की रात्रीचं केर काढू नये. आणि काही लोकं आजही हा नियम पाळतात की घरात रात्रीच्या वेळी साफ-सफाई करायची नाही. या परंपरेमागे धार्मिक आणि वैज्ञानिक तथ्य असल्याचे कळून येते.


 

धार्मिक तथ्य

रात्रीच्या वेळी केर बाहेर फेकणं अशुभ मानले जाते. असं म्हणतात की संध्याकाळनंतर देवी लक्ष्मी कधीही आपल्या दाराशी येऊ शकते म्हणून त्यावेळी केर काढून बाहेर फेकणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे आहे. यामुळे रात्री केर काढणे वर्जित आहे.

वैज्ञानिक तथ्य

रात्रीच्या वेळी सफाई न करण्यामागील वैज्ञानिक कारण हे आहे की घरातील प्रत्येक सदस्य सकाळी केर-पोचा झाल्यावरचं अंघोळ करतो त्याने शरीरावरील जिवाणू साफ होऊन जातात. आणि जर हे सफाईचे काम रात्री केलं तर धूळ, घाण, जिवाणू घरातील लोकांच्या शरीरावर चिपकून राहतील आणि त्यानंतर अंघोळ न केल्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.