शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By wd|
Last Modified: मांडवी , शनिवार, 5 जुलै 2014 (17:14 IST)

शनिदेवासाठी 32 हजार ब्राह्मण करणार महायज्ञ

गुजरातच्या सीमेवर असलेल्या कच्छ जिल्ह्यातील ध्रबुडीमध्ये 1100 मंडपीय यज्ञाची तयार सुरु आहे. सुमारे 900 एकर जागेवर ऋषिकालिन यज्ञशाळा तयार केली जात आहे. देशाला शनिदेवाच्या कोपापासून मुक्तता करणे, हा या महायज्ञामागील मुख्य उद्देश आहे. 17 ते 25 नोव्हेंबर 2015 या कालावधीत यज्ञ होणार आहे. विशेष म्हणजे 32 हजार ब्राह्मण एकाच वेळा महायज्ञात आहुती देणार आहेत.

 
56 घनफुट व्यासाचे एक यज्ञ कुंड असेल. प्रत्येक यज्ञकुंड 1.60 लाख वैदिक मंत्रोपचारात आहुती दिली जाईल. महायज्ञमध्ये एकूण 17.60 कोटी आहुती दिली जाणार आहे. यासाठी एकूण 352 टन यज्ञ सामग्री तयार करण्‍यात आली आहे. सय्या आध्यात्म शक्तिपीठ-हरियाणाचे तपोनिष्ठ संत कौशलेन्द्रजी प्रसाद यांच्या प्रेरणेने या महायज्ञाची धार्मिक समितीने आयोजनाची तयारी केली आहे. संपूर्ण यज्ञशाला 25,34,000 वर्ग फुटाचा आकार घेईल. यात 1100 विद्वान आचार्य तसेच  32 हजार ब्राह्मण यज्ञशाळेच्या वैदिक कार्यास योगदान देतील. 1100 जोडपे यज्ञपूजेसाठी बसतील. द्वारकाधीशजी हे महायज्ञाचे मुख्य यजमान आहेत