शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (11:30 IST)

श्रद्धा आणि विश्वास

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची देवावरची श्रद्धा हे त्याच्यावर उपकार आहेत तर तुम्ही चुकता आहात. तुमची देव आणि परमेश्वरावरची श्रद्धा ह्याने देव आणि गुरू यांना काही फरक पडत नाही. श्रद्धा हे तुमचे धन आहे. श्रद्धा तुम्हाला क्षणात शक्ती देते. श्रद्धा तुमच्यामध्ये स्थैर्य, एकतानता, शांती आणि प्रेम निर्माण करते. श्रद्धा हा तुम्हाला लाभलेला आशीर्वाद आहे. 
 
तुम्ही श्रद्धाहीन असाल तर ती मिळविण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. पण प्रार्थना करण्यासही श्रद्धा हवी. हाच तर विरोधाभास आहे.
 
लोक जगावर श्रद्धा ठेवतात. पण सारे जग तर साबणाचा बुडबुडा आहे. लोकांची स्वत:वर श्रद्धा असते पण त्यांना ठाऊक नसते आपण कोण आहोत. लोकांना वाटते त्यांची देवावर श्रद्धा आहे, पण त्यांना खरे माहीतच नसते की परमेश्वर कोण आहे. 
 
तीन प्रकारच्या श्रद्धा असतात. 
तुमची स्वत:वर श्रद्धा- स्वत:वर श्रद्धा नसल्यामुळे तुम्हास वाटते की, मी हे करू शकत नाही. हे माझ्यासाठी नाही. मी या जन्मात कधीच मुक्त होऊ शकणार नाही. 
जगावर श्रद्धा- तुमची जगावर श्रद्धा हवी नाहीतर तुम्ही एक तसूभरही हलू शकणार नाही. तुम्ही बँकेत पैसे ठेवता कारण ते परत मिळवण्याची श्रद्धा असते. तुम्ही प्रत्येक गोष्टीविषयी शंका घेतलीत तर तुमच्यासाठी काही घडणार नाही. 
ईश्वरावर श्रद्धा- ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि विकसित व्हा, या सर्व श्रद्धा एकमेकांशी संबंधित आहेत. प्रत्येक श्रद्धा बलवान होण्यासाठी तुम्हाला या तिन्ही हव्यात. तुम्ही प्रत्येक गोष्टीविषयी शंका घेतलीत तर तुमच्यासाठी काही घडणार नाही. 
 
नास्तिकांना स्वत:विषयी आणि जगाविषयी श्रद्धा असते. पण परमेश्वरावर नसते. मग त्यांची स्वत:वरच पूर्ण श्रद्धा नाही आणि त्यांची जगावरची श्रद्धा विचलित असेल कारण त्यात सारखे बदल होत असतात. 
 
श्री श्री रविशंकर 
‘मौन एक उत्सव’ मधून साभार