शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 23 डिसेंबर 2014 (16:56 IST)

सद्गुण : श्री श्री रविशंकर

सद्गुण हे अभ्यासपूर्वक मिळवता येत नाहीत. तुम्हाला गृहित धरावे लागते की, ते आहेतच. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, ‘‘अर्जुना   दु:ख करू नकोस, तू सद्गुणांसोबतच जन्माला आला आहेत’’ ‘जिज्ञासूने हे लक्षात ठेवायला हवे की, तो सद्गुणांबरोबरच जन्मला आहे.’ नाहीतर तो जिज्ञासू होऊच शकला नसता. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यात सद्गुण नाहीत, आणि मग ते मिळविण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्ही अपयशी व्हाल. 
 
बहुतेक वेळा तुम्ही सद्गुणांच्या आधारावर स्वत:ची दुसर्‍याबरोबर तुलना करता. तुमची त्यांच्याबरोबर तुलना करू नका. फक्त दुसर्‍यांमधील ज्या सद्गुणांचे तुम्ही कौतुक करता ते ओळखा आणि हे समजून घ्या की ते तुमच्यात बीजाच्या स्वरूपात आधीपासूनच स्थिर आहेत. तुम्ही फक्त त्याचे संवर्धन करायचे आहे. 
 
श्री श्री रविशंकर 

(‘मौन एक उत्सव’ मधून साभार)