शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

समर्थ रामदास स्वामींनी केलेले शिवथर घळीचे वर्णन.

गीरीचे मस्तकी गंगा ।
तेथुनि चालिली बळे ।
धबाबा लोटती धारा ।
धबाबा तोय आदळे ॥ १

गर्जतो मेघ तो सिंधु ।
ध्वनि कल्लोळ उठीला ।
कड्यासी आदळे धारा ।
वात आवर्त होतसे ॥ २॥

तुशार उठती रेणु ।
दुसरे रज मातले ।
वात मिश्रीत ते रेणु ।
सीत मिश्रीत धुकटे ॥ ३

दराच तुटला मोठा ।
झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटली छाया ।
त्यामधे वोघ वाहाती ॥ ४॥

गर्जती स्वापदे पक्षी ।
नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री ।
ध्वनीकल्लोळ उठती ॥ ५

कर्दमु निवदेना तो ।
मनासी साकडे पडे ।
विशाळ लोटली धारा ।
ती खाली रम्य विवरे ॥ ६॥

कपाटे नेटक्या गुंफा ।
तापसी राहती सदा ।
नेमस्त बांधली नाना ।
उत्तमे निर्गळे स्थळे ॥ ७

विश्रांती वाटते तेथे ।
जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा ।
सार्थके काळ जातसे ॥ ८॥