शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By सौ. कमल जोशी|

सर्वत्र प्रेमाचा आविष्कार

निथळीच्या घामाचाच पैसा परमात्म्याला आवडे

भगवान श्रीकृष्णाचे सर्वांवर सारखेच प्रेम होते. इतकेच काय पण त्यांना विष पाजणारी पुतना, असंख्य शिव्या देणारा शिशुपाल आणि छातीवर लाथ मारणारा ब्राम्हण ह्या सर्वांवर त्यांनी प्रेम केले. जेव्हा भृगु ऋषीने त्यांच्या छातीत लाथ मारली तेव्हा त्यांनी ऋषीचे पाय धरले व प्रेमपूर्वक म्हणाले माझी छाती कठोर आहे, तुमचे कोमल पाय दुखले असतील, मला त्याचे वाईट वाटते असे पवित्र विचार श्रीकृष्णाचे होते. अशा विचारातच भक्तीची वृध्दी होते आणि जीवनात शान्ती प्राप्त होते.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी