शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

स्नान करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

सुंदर शरीर आणि चांगल्या आरोग्यासाठी दररोज स्नान करणे आवश्यक आहे. जे लोक नियमित स्नान करतात त्यांना आरोग्याचे अनेक लाभ प्राप्त होतात.

स्नान करण्यसाठी सकाळची वेळच योग्य आहे, परंतु अनेक लोक दिवसातील वेगवेगळ्या वेळी स्नान करतात.
 
शास्त्रामध्ये स्नानाच्या वेळेनुसार स्नानाचे विविध प्रकार सांगण्यात आले आहेत. याचबरोबर स्नानाचा एक विशेष विधीही आहे. या विधीनुसार स्नान करणे खूप लाभदायक ठरते. 
 
स्नान करताना सर्वात पहिले डोक्यावर पाणी टाकावे त्यानंतर संपूर्ण शरीरावर, यामागे वैज्ञानिक कारण आहे, अशा प्रकारे स्नान केल्यास आपले डोके व शरीरातील वरच्या भागातील उष्णता पायाद्वारे निघून जाते. यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते, मन शांत राहते, आळस आणि थकवा दूर होतो.