शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हिंदू धर्मात जो सजीव तो आत्मा असतो

हिंदू धर्म जगातील सर्वांत जुन्या धर्मांपेकी एक आहे. ख्रिश्चन व मुस्लिम धर्मानंतर या धर्माचे अनुयायी जगात सर्वाधिक म्हणजे जवळपास 100 कोटींहून अधिक आहेत. 
 
हिंदू शब्द पारशी भाषेतून आला. ते लोक सिंधू नदीला हिंदू म्हणत. त्यापलिकडे राहणार्‍यांनाही ते हिंदू म्हणत. हिंदू धर्माचा कोणीही संस्थापक नाही. कोणतेही मुख्य पीठ नाही. 
 
हिंदू धर्मात असे मानले जाते, की जो सजीव आहे त्याच्यात आत्मा आहे. त्यालाच मोक्ष मिळू शकतो. आत्मा अमर आहे. तो फक्त शरीर बदलतो. पुढे कामानुसार हिंदूंमध्ये चार जाती पडल्या. जे देवाची पूजाअर्चा करतात, त्यांना ब्राम्हण म्हटले जाऊ लागले. 
 
हिंदू धर्मात जीवनाचे चार टप्पे ( आश्रम) आहेत. पहिला टप्पा म्हणजे ब्रम्हचर्य (विवाह पूर्व काळ) गृहस्थाश्रम (विवाहानंतरचा काळ), वानप्रस्थाश्रम (अध्यात्म) व शेवटी संन्यासाश्रम. बुध्द, जैन व शीख हे धर्म हिंदू धर्मातूनच उगम पावले.