testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सोलापूर लोकसभेचा इतिहास

बी.ए. मुल्ला

loksabha
वेबदुनिया|
WD
आगामी मार्च-एप्रीलमध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन गॅझेट क्रमांक-42, लोकसभा मतदारसंघाचा इतिहास लिहिताना अनेक पाने पुरणार नाहीत, पण हा अल्पसा प्रपंच इथे करीत आहोत, आपला देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर देशामध्ये सर्व प्रथम 1952 साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळेला आपला सोलापूर, नांदेड, पुणे जिल्ह्यातील काही भाग व उस्मानाबाद अशा चार जिल्ह्यांचा मतदारसंघ होता. हीच प्रथा 1957 सालीही होती त्यानंतर 1 मे 1960 ला भाषावार प्रांतरचना अंतर्गत महाराष्ट्र हे स्वतंत्रराज्य निर्माण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1962 ला तिसरी लोकसभा निवडणूक झाली. मात्र या निवडणुका झाल्या त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघ व पंढरपूर मतदारसंघ असे दोन मतदारसंघ स्वंतत्र झाले पैकी सोलापूर मतदारसंघ सर्वप्रथम 1962 ला स्वतंत्र झाला. या निवडणुकीत सोलापूरचे पहिले खासदार होण्याचा बहुमान सोलापूरचेच मडेप्पा बंडप्पा ऊर्फ अप्पासाहेब काडादी यांना मिळाला. त्यानंतर मात्र 1967 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी मात्र प्रथमच स्थानिक उमेदवार न देता मुंबईचे उद्योगपती असलेले सूरजरतन फत्तेचंद दमाणी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि दमाणी प्रचंड मताने निवडून आले. त्यानंतर मात्र देशाच्या राजकारणात अनेक उलाढाली झाल्या.

प्रामुख्याने काँग्रेसची सत्ता असल्याने तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी विकासकामाअंतर्गत अनेक योजना राबविल्या. त्यामध्ये प्रामुख्याने संस्थानिकांचे तनखे रद्द, बँक राष्ट्रियीकरण, गरिबी हटाव, कुटुंबनिोजन वगैरे. काँग्रेसपक्षातीलच एक गट इंदिराजींच्या या कार्यपद्धतीवर नाराज होऊन विरोधात गेला व पक्षात सिंडीकेट व इंडिकेट असे दोन गट पडले. हे सर्व घडत असताना 1970 साल उजाडले. विरोधकांच्या आव्हानामुळे इंदिराजींनी 1971 साली लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या व नियमाप्रमाणे 1972 ला लोकसभेच्या निवडणुका होण्याऐवजी 1971 ला मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या. ही 1971 ची सोलापूर लोकसभेची निवडणूक अतिशय अटीतटीची व चुरशीची झाली कारण यावेळेला काँग्रेसचे उमेदवार सूरजरतन दमाणी हे अतिशय धनाढय़ व मिल मालक होते. त्यांच्या विरोधात दैनिक संचारचे तत्कालीन संपादक रंगाअण्णा वैद्य यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. ही 1971 ची लोकसभा निवडणूक अतिश रोमहर्षक ठरली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. रंगाअण्णांना सोलापूर मतदारसंघात ग्रामीण व शहरी भागातून सर्व थरातून भरघोस पाठिंबा मिळत होता. मात्र दमाणींचा यावेळी निसटता विजय झाला व लोकनायक रंगाअण्णा अल्पमताने पराभूत झाले. मात्र रंगाअण्णांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर आला आणि एक रोमहर्षक इतिहास निर्माण झाला.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार

national news
चालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...

किमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला

national news
वाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...

बाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली

national news
मुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...

व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’

national news
व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...

ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार

national news
पुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...