testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

1977 मधील जनता लाट

1977 loksabha election
Last Modified सोमवार, 12 मे 2014 (15:37 IST)
आणीबाणीमुळे इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात जबरदस्त वातावरण तयार झाले होते. याचा प्रत्यय 1977 च्या लोकसभा निवडणुकीत आला. केवळ जनता पक्षाच्या नावावर अनेक उमेदवार निवडून आले. त्यावेळच्या जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी यांना 1977 मध्ये ठाणे मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. पुण्यातून समाजवादी पक्षाचे मोहन धारिया यांना जनता पक्षाची उमेदवारी मिळाली. रामभाऊ म्हाळगी हे पुण्याचे. 1971 मध्ये त्यांनी पुण्यातूनच लोकसभेची निवडणूक लढवली होती. म्हाळगी यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, असा आग्रह त्यावेळच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षाच्या नेतृत्त्वाकडे धरला. त्यामुळे म्हाळगी यांना ठाण्यातून उमेदवारी दिली गेली.
त्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या विरोधात एवढी प्रखर लाट होती की स्थानिक आणि उपरा उमेदवार अशी तुलना करण्याचेही मतदारांच्या मनात आले नव्हते. रामभाऊ म्हाळगी हे ठाणेकरांना अपरिचित होते; तरीही त्या निवडणुकीत ते प्रचंड मतांनी लोकसभेवर निवडून गेले. याच निवडणुकीत जॉर्ज फर्नाडिस हे बिहारमधील समस्तीपूर मतदारसंघातून निवडून आले. विशेष म्हणजे जॉर्ज फर्नाडिस हे निवडणुकीवेळी तुरुंगात होते. त्याआधीच्या 67 आणि 71 अशा दोन लोकसभा निवडणुका जॉर्ज फर्नाडिस यांनी मुंबईतून लढवल्या होत्या. बिहारशी तसा फर्नाडिसांचा काहीच संबंध नव्हता. मात्र आणीबाणीविरोधी लाटेत फर्नाडिस हे संपूर्ण देशातून विक्रमी मतांनी लोकसभेवर निवडून आले.

- आशिष जोशी


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सिक्कीम जगातील पहिले Organic State

national news
संयुक्त राष्ट्रांनी सिक्कीम राज्याला जगातलं पहिलं Organic State हा बहुमान प्रदान केला ...

'ती' वादग्रस्त दोन पुस्तके रद्द

national news
वादग्रस्त पुस्तकांच्या पडताळणीसाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या ...

पीएफच्या व्याजदरात वाढ

national news
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आले. जुलै ते सप्टेंबर या ...

यूट्यूब सेवा पुन्हा सुरु

national news
अर्ध्या तासाच्या खोळब्यानंतर जगभरातील यूट्यूब सेवा पुन्हा सुरु झाली आहे. याआधी यूट्यूब ...

नवरात्रीत का करतात कन्या पूजन?

national news
नवरात्रीचा संबंध जगतजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही ...