1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. होळी
Written By वेबदुनिया|

रंग खेळताय? ही काळजी घ्या

रंगपंचमी हा मौज मस्तीचा उत्सव आहे. आणि त्याची मजा तुम्हाला घ्यायची असेल तर खाली दिलेल्या बाबींकडे लक्ष द्या:

WD
1. रंग खेळायला बाहेर निघाल तेव्हा तुमच्या अंगाला खोबर्‍याचे तेल किंवा गोड तेल लावायला पाहिजे.
2. होळी खेळताना तुम्ही जुने कपडे घाला. पण हे लक्षात ठेवा की ते कापड इतकेसुद्धा जुनं नको की रंगाच्या मस्तीत, ओढाओढीमध्ये ते फाटेल.
3 होळी खेळताना तुम्हाला तुमच्या नखांची सुद्धा काळजी घ्यायला हवी, म्हणून रंग खेळण्याअगोदर त्यांना नेलपेंट लावून घ्या आणि जर नखे वाढली असतील तर त्यांना कापून घ्या.
4. होळी खेळताना सलवार-सूट, जीन्स-पँटसारखे कपडे घालावे. त्याने पूर्ण अंग झाकले जाते. आणि तुम्ही बिनधास्त रंग खेळू शकाल.
5. होळीचा रंग खेळताना डार्क रंगांच्या कपड्यांची निवड करावी, कारण पांढरे किंवा हलक्या रंगांचे कपडे भिजल्यावर पारदर्शी होऊन जातात. तेव्हा महिलांना याकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे.
6. रंग खेळायच्या आधी आपले दागिने काढून ठेवा. रंगाच्या मस्तीत ते कुठेतरी हरवून जातील.
7. केसांना तेल लावायला पाहिजे. म्हणजे केसांना रंग लागणार नाही.
8. हल्ली रासायनिक रंगांचा वापर केला जातो, त्यामुळे शरीराला खाज सुटणे वा ऍलर्जी येण्याचा धोका असतो. पण असे रंग पोटात गेल्यास नुकसानदायी ठरतात.