1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मार्च 2023 (13:34 IST)

Holi 2023 धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी करा चंद्रदेवाला प्रसन्न

holi purnima 2023 upay
जर तुम्ही गंभीर आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर होळीच्या दिवशी हा चंद्राचा उपाय अवश्य करा. होळीच्या रात्री चंद्रोदयानंतर आपल्या घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेवर उभे राहा जिथून चंद्र दिसतो.
 
नंतर चंद्राचे स्मरण करून चांदीच्या ताटात कोरडे खजूर आणि काही काजू ठेवा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून उदबत्ती लावा. आता दुधाने अर्घ्य द्या.
 
अर्घ्य दिल्यानंतर पांढरा प्रसाद आणि केशर मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पित करा. आर्थिक संकट दूर करण्यासाठी आणि समृद्धी प्रदान करण्यासाठी चंद्राला विनंती करा. नंतर मुलांमध्ये प्रसाद आणि मखाणे वाटप करा.

त्यानंतर प्रत्येक सलग पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दूध अर्पण करावे. काही दिवसांतच तुम्हाला आर्थिक संकट दूर होत असल्याचे जाणवेल.
 
या उपायाने श्रीकृष्ण आपल्या कलांचे शुभ वरदान देतात आणि देवी लक्ष्मी धनाचा आशीर्वाद देते.