शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:26 IST)

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची अत्यंत लोकप्रिय मालिका सेक्रेड गेम्स आणि लस्ट स्टोरीज यांना बेस्ट ड्रामा व बेस्ट मिनी सीरीज या विभागांत नामांकन मिळाले आहे. तसेच अभिनेत्री राधिका आपटे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागात नामांकन मिळाले आहे.
 
एमी हा ऑस्करप्रमाणेच टी.व्ही. मनोरंजन क्षेत्रातील नामांकीत पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा पुरस्कार पटकवणे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या कलाकाराचे जगभरातून कौतूक केले जाते. या पार्श्वभूमिवर विचार करता भारतीय मालिकांना एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळणे नक्कीच कौतुकास्पद आहे. या पुरस्कार स्पर्धेत एकूण २१ देशांमधील ४४ मालिकांना नामांकन मिळाले आहे. न्यूयॉर्कमध्ये येत्या २५ नोव्हेंबर रोजी एमी पुरस्कार सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात विजेत्यांची घोषणा केली जाईल.