शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जुलै 2017 (08:59 IST)

प्रियांका हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार आहे. प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. प्रियांकाने प्रादेशिक भाषांमधील सिनेमांची निर्मिती केली. ज्यामध्ये तिला चांगलं यशही मिळालं. त्यानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत ती हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार आहे, असं मधू चोप्रा यांनी सांगितलं.

हॉलिवूड सिनेमा महिला सक्षमीकरण किंवा वंशद्वेशावर आधारित असेल. ज्यांना कुणाचा आधार नाही, अशांना अधिकार मिळवून द्यायचे असं, प्रियांकाने सिनेमा निर्मितीत पाऊल ठेवतानाच ठरवलं होतं. यावर्षी आमचे तीन प्रादेशिक भाषांमधले सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. आता प्रियांकाची बॉलिवूड सिनेमाची निर्मिती करण्याचीही इच्छा आहे. हॉलिवूड सिनेमाची निर्मिती प्रक्रिया या वर्षाअखेरपर्यंत सुरु होईल, असं मधू चोप्रा म्हणाल्या.