शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन
Written By वेबदुनिया|

चित्रपटांनी धगधगत ठेवली राष्ट्रभक्तीची मशाल

मनोज पोलादे

WD
बॉलीवूडने अनेक सामाजिक विषय हाताळण्यासोबत प्रखर राष्ट्रभक्तीचाही जयघोष केला आहे. १९४७ पासून आजपर्यंत राष्ट्रासमोरील आव्हाने बदलत गेली त्याप्रमाणे राष्ट्रभक्तीपर चित्रपटातील आशयात बदल होत गेला. स्वातंत्र्यानंतर नवराष्ट्रनिर्मितीची आकांक्षा, स्वप्न, सामाजिक बदल, सुधारणांचे प्रतिबिंब या चित्रपटांमधून उमटले.

राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग, योगदान देण्यासाठी हे चित्रपट नव- तरूणांचे प्रेरणास्त्रोत बनले. अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी सोडून आधुनिक विचार रूजवण्यातही महत्त्वपूर्ण वाटा उचलला. देशास प्रगतीच्या, विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी श्वेत क्रांतीपासून हरित क्रांतीपर्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा चित्रपट साक्षीदार राहिला आहे. राष्ट्रनिर्मितीत संपूर्ण देशास अन्नपुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचे अनन्यसाधारण महत्त्वही चित्रपटांनीत अधोरेखीत केले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवराष्ट्रनिर्मितीत पायाभूत व अत्यावश्यक सुविधांसोबतच सामाजिक सुधारणा घडवून आणणे कठिण आव्हान होते. अनेक समाजसुधारकांनी यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले. चित्रपटांनी या मोहिमेचे आशय, विषय व सादरीकरणातून समर्थ नेतृत्व केले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीयांनी रक्त सांडले असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, असा संदेश बहुतांश चित्रपटातून ठसवल्या गेला.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वप्नातल्या देशाचे सुंदर स्वप्न साकार करण्यासाठी सामोरे असलेली आव्हाने व हाती घ्याव्या लागणार्‍या सुधारणा, यांचा लेखाजोखा मांडणारे चित्रपट आले. यानंतर शत्रुराष्ट्रांकडून भारताच्या अखंडतेस, सार्वभौमत्वास आव्हान देण्यात आल्यानंतर मातृभूमीसाठी रक्त सांडून कोणत्याही परिस्थितीत सीमेचे रक्षण करणार्‍या जवानांची वीरगाथा रूपेरी पडद्यावरून साकारल्या गेली.

भारताच्या सैन शक्तीसमोर नतमस्तक झाल्यानंतर शत्रूरात्रांनी दहशतवादाद्वारे देश पोखरण्याचा प्रयत्न केला, नक्षलवाद, माओवादास खतपाणी घालून देशासमोर अंतर्गत सुरक्षेचे नवे आव्हान निर्माण केले. या पार्श्वभूमीवर चित्रपटांमधून हे वास्तवही उमटले. शत्रूंनी आमच्या मातृभूमीकडे बघण्याचीही हिम्मत करू नये, असा दम या चित्रपटांतून भरण्यात आला.

या प्रवासात चित्रपटाचा नायक कधी सैनिक, पोलिस, अधिकारी बनला तर कधी देशभक्त नागरिक, कर्तव्यनिष्ठ डॉक्टर, सामाजिक सुधारणा घडवून आणणारा सुधारक, नवीन विचार रूजवणारा सुशिक्षित तरूण, अन्नधान्य पिकवणारा शेतकरी, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण भारतास विकासाची वाट दाखवणारा शास्त्रज्ञ बनला. अन्याय, अत्याचार, व्यवस्थेविरूद्ध बंड करून उठणारा नायक झाला.
चित्रपटांनी एकता, अखंडता, सार्वभौमत्व अखंड ठेवण्यासोबतच सर्वांगीण विकास व सुधारणा घडवून राष्ट्रास प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी झटणार्‍या देशवासीयांच्या स्पंदनास अभिव्यक्ती दिली. नवराष्ट् उभारणी, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकाच्या रक्षणासाठी प्रखर नेतृत्

चित्रपटांनी एकता, अखंडता, सार्वभौमत्व अखंड ठेवण्यासोबतच सर्वांगीण विकास व सुधारणा घडवून राष्ट्रास प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी झटणार्‍या देशवासीयांच्या स्पंदनास अभिव्यक्ती दिली. नवराष्ट् उभारणी, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकाच्या रक्षणासाठी प्रखर नेतृत्व निर्माण करण्याची प्रेरणा या चित्रपटांनी कायम स्फुरत ठेवली. समाजात सकारात्मक विचार रूजवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती रूजवण्यासाठी नेतृत्व हाती घेतले.