कांदा लावून रडले ओबामा!
वॉशिंग्टन- अवैध बंदुकीच्या वापरावर निर्बंध घालण्याच्या मुद्द्यावर बोलताना ओबामा यांना अश्रू आवरता आले नाही आणि ते कोसळले. मात्र, त्यांचे समीक्षक 'फॉक्स न्यूज' टीव्ही चॅनलने दावा केला आहे की त्या अभिनयासाठी ओबामा यांनी कांद्यांच्या वापर केला होता.
व्हाईट हाउसमध्ये देशांतरागत सुरक्षेच्या मुद्द्यावर भाषण करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तेव्हा डोळे पुसताना दिसले होते जेव्हा तीन वर्षांपूर्वी कनेक्टिकटच्या न्यू टाऊन मधील एका शाळेत झालेल्या गोळीबारात 20 मुले ठार झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
न्यूज चॅनलवर चाललेल्या कार्यक्रमात आंद्रिया तांतारोज हिने म्हटले की ओबामा यांचे भावुक होणे विश्वसनीय नव्हते. ते नाटकी वाटत असून त्यांनी कांद्याचा किंवा इतर कोणतेतरी प्रॉडक्ट वापरले असावे.