गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

हजसाठी सहा लाख यात्रेकरू सौदीत

WD
रियाद:हज यात्रा हे प्रत्येक मुस्लिम नागरिकाचे स्वप्न असते.हे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून प्रत्येकजण धडपडत असतो.ही यात्रा व्यक्तीने आपल्या ऐहिक जीवनातील सर्व कत्र्यव्ये पार पाडल्यानंतर पूर्ण करावी, असा संकेत आहे.दरवर्षी सौदीमध्ये या यात्रेसाठी मोठी गर्दी होते.

यावर्षी हजच्या महिन्यात आतापर्यंत सुमारे सहा लाख यात्रेकरू हजसाठी सौदी अरबमध्ये पोहचले आहेत.यातील निम्मे यात्रेकरू मक्का येथे आणि उर्वरीत यात्रेकरू मदीनामध्ये उपस्थित आहेत.सौदी प्रेस संस्थेनुसार हज विभागाचे मंत्री हात्तम काधी यांनी सांगितले, हज मंत्रालयाने यावेळी ४० हजार कर्मचारी यात्रेकरूंच्या मदतीसाठी नियुक्त केले आहेत.मदीनामध्ये प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलाजिज विमानतळात शुक्रवारी ९६ पेक्षा जास्त विमाने उतरली आहेत.जेद्दाहमध्ये किंग अब्दुल अजिज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दरदिवशी १०० पेक्षा जास्त विमान उतरत आहेत. मक्का मस्जिदमध्ये सुरू असलेल्या डागडुजीच्या पाश्र्वभूमीवर यंदा गतवर्षीची तुलनेत कमी यात्रेकरू उपस्थित होतील, असा अंदाज आहे.