बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

मलेशियात 330 दुर्मिळ कासवे जप्त

क्वालालंपूर- मलेशियाच्या सीमाशुल्क विभागाने तस्करी करण्यात येत असलेली 330 दुर्मिळ कासवे जप्त केली असून या कासवांची किंमत सुमारे 3 लाख अमेरिकन डॉलर इतकी आहे.
 
सीमाशुल्क विभागाचे अधिकारी अब्दुल वाहीद सुलाँग यांनी दिलेल्या माहितीनुसार क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुर्मिळ जातीची 330 कासवे जप्त करण्यात आली आहेत. ही सर्व कासवे जिवंत असून मदागास्कर येथून ही कासवे आणण्यात आल्याची शक्यता आहे.
 
स्थानिक मार्केटमध्ये कासवांची विक्री करण्यात येणार होती. या प्रकरणी तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर तपासणी केल्यास ही कासवे आढळून आली.
 
मादागास्कर येथील अँटानारिओ विमानतळाहून ही कासवे क्वालालंपूर येथे आण्यात आली होती. दगड आणण्यात आल्याचे प्रवाशाकडून सांगण्यात आले होते. पण त्यामध्ये प्रत्यक्षतात कासवे होती. मलेशियात प्राण्यांची आयात करण्यास बंदी असून दोषींना दंड व तीन वर्षांची शिक्षा करण्यात येते.