डॉक्टरांनी एका व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून मोठ्या आंतड्यातून ईल मासा काढला
व्हिएतनाम मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी एका व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून मोठया आंतड्यातून 26 इंचाचा ईल मासा काढला आहे. या व्यक्तीने आपल्या गुदद्वारातून हा जिवंत मासा टाकला होता. त्यानंतर त्याला असह्य वेदना सुरु झाल्या.
27 जुलै रोजी या व्यक्तीने डॉक्टरांकडे वेदना होत असल्याची तक्रार केली. त्याची चाचणी केल्यावर मासाने या व्यक्तीच्या मोठ्या आंतड्याला चावण्याचा प्रयत्न केला होता.
डॉक्टरांनी त्याच्या गुदद्वारातून मासा काढण्याचा प्रयत्न केला पण मासा सोबत लिंबू देखील अडकला होता.या प्रयत्नात ते अपयशी ठरले. नंतर त्याच्यावर अवघड शस्त्रक्रिया करून पोटात चिरा लावून फोर्सेपच्या साहाय्याने ईल मासा काढण्यात आला.
डॉक्टरांनी लिंबू गुदाद्वारातून काढून त्याच्या आतड्यांवर उपचार केले. त्याच्या पोटातून निघणाऱ्या विष्ठेला स्वच्छ करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की तातडीनं या व्यक्तीवर उपचार झाले नसते तर त्याच्या जीवाला धोका होता.
डॉक्टरांनी सांगितले की, अशा प्रकारे एखाद्या जीवित प्राणी बाहेर काढण्याची प्रथमच वेळ आहे. असे कोणतेही काम करू नका जेणे करून तुमच्या जीवाला धोका होईल असे डॉक्टरांनी आवाहन केले आहे.
Edited By- Priya Dixit