शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (10:19 IST)

गर्भवती महिलेला हत्तींच्या कळपाने चिरडून ठार केले

elephant
एका गर्भवती महिलेला हत्तींच्या कळपाने चिरडून ठार केले. ही दुर्दैवी घटना इंडोनेशियातील दक्षिण सुमात्रा येथे घडली आहे. जिथे एक महिला तिच्या शेतात घुसलेल्या हत्तींना पळवण्याचा प्रयत्न करत होती. ही घटना मुसी रिजन्सी परिसरात घडली. तसेच पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार जिथे 100 हून अधिक भयंकर हत्ती सक्रिय आहे आणि हे हत्ती अनेकदा कळपाने फिरत असतात.
 
मिळालेल्या माहितीनुसार कारसिनी नावाची 33 वर्षीय महिला पती रसुमसोबत रबराच्या झाडांची छाटणी करत होती. तसेच अचानक हत्तींचा कळप त्यांच्या बागेत शिरला. कारसिनी या 5 महिन्यांच्या गरोदर होत्या व त्यांनी हत्तींना शेतातून हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु कळप नियंत्रणाबाहेर गेला आणि त्यांच्यावर हल्ला करून त्यांना चिरडले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक अधिकारींनी सांगितले की, हत्तींचे कळप आणि त्यांच्या बागांमध्ये घुसण्याच्या घटना वाढत आहे, त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याची गरज आहे.
 
तसेच हत्तींना घाबरवण्यासाठी रिकाम्या छडीला एकत्र चोळले जाते, त्यामुळे हत्ती घाबरतात आणि पळून जातात. कारसिनी तेच करत होती, पण 4,000 किलो वजनाच्या हत्तीने तिला चिरडले. तसेच आवाजामुळे हत्ती संतप्त झाले आणि त्यांनी जोडप्यावर हल्ला केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात कारसिनी आणि तिचे न जन्मलेले बाळ दोघेही चिरडून ठार झाले.