शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (13:39 IST)

मालकाच्या मृत्यूनंतर माकड मृतदेहाजवळ बसून श्वास तपासत राहिला,श्रद्धांजली वाहिली

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही मनाला हालवून  टाकणारे असतात. सध्या एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हायरल व्हिडिओ श्रीलंकेचा आहे ज्यामुळे लोक एका व्यक्तीच्या मृत्यूने भावूक झाले आहेत. यामध्ये एका व्यक्तीच्या मृतदेहाजवळ लंगूर बसलेला दिसत आहे. भावूक करताना या व्हिडिओने इंटरनेटवर अनेकांची मने जिंकली आहेत. पीतांबरम राजन असे या व्यक्तीचे नाव असून दीर्घ आजाराने वयाच्या 56 व्या वर्षी निधन झाले. श्रीलंकेतील बट्टिकालोआ येथील रहिवासी पीतांबरम राजन यांचे पार्थिव श्रद्धांजली वाहण्यासाठी घराच्या कट्ट्यावर ठेवण्यात आले होते. पीतांबरम राजन यांना लोक श्रद्धांजली वाहत होते, तेव्हा एक माकड येऊन मृतदेहाजवळ जाऊन बसला. तेथे उपस्थित असलेल्या पीतांबरम यांच्या कुटुंबीयांना हे पाहून धक्काच बसला. पीतांबरम राजन यांच्या मृतदेहाजवळ माकड बसला होता आणि तो तेथून हलला नाही. मालक श्वास घेत आहे की नाही ते तपासत होता. मालक त्याला दररोज खायला द्यायचा, त्याची काळजी घ्यायचा . मालक आणि माकडामध्ये चांगली मैत्री होती.माकड मालकाचा श्वास चालत हे का हे वारंवार तपासत  आहे. त्यांना उठवायचा प्रयत्न करत आहे.  माकडाचे त्यांच्यावरील प्रेम पाहून लोक भावूक झाले.