शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , शनिवार, 28 जानेवारी 2017 (11:54 IST)

अमेरिका भारत लष्‍करी सहकार्य आणखी वाढणार!

अमेरिका व भारतामधील संरक्षणविषयक सहकार्य हे सध्या परमोच्च पातळीवर असले, तरी काही वेळा प्रशासकीय व्यवस्थेमुळे द्विपक्षीय सहकार्याचा वेग मंदावतो, असे मत अमेरिकन सैन्यामधील  उच्चाधिकारी जनरल रॉबर्ट ब्राऊन यांनी व्यक्त केले आहे. ब्राऊन हे अमेरिक्न सैन्याचा प्रशांत महासागार विभागाचे मुख्‍याधिकारी आहेत. भारत हा या भागातील अत्यंत महत्वपूर्ण देश असल्याचे निरीक्षण यांनी यावेळी बोलताना नोंदविले. भारतीय लष्कराबरोबर अमेरिकेचे संबंध कायमच उत्तम राहिले आहेत. मात्र, कधी कधी नोकरशाहीमुळे सहकार्याचा हा वेग मंदावतो.