अमेरिकन निवडणूक; बॅलेटवर सहा भारतीय भाषा
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. या निवडणुकीमध्ये भारतीय महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. अमेरिकेत भारतीय वंशाचे मतदार मोठ्या संख्यने आहेत. त्यामुळेच भारतीयांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही मोठ्या पक्षांनी प्रयत्न सुरु केलेत.
याचा प्रत्यय सध्या सध्या निवडणुकींच्या बॅलेटकडे पाहिल्यावर येत आहे. अनेक भारतीय भाषांना बॅलेट मतदान पद्धतीमध्ये स्थान देण्यात आले आहे. यामध्ये हिंदीबरोबरच तेलुगू, गुजराती, पंजाबी, तमिळ भाषांनाही स्थान देण्यात आले आहे.