गुरूवार, 12 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (20:20 IST)

तुर्कीमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश,6 जवानांचा मृत्यु

plance crash
तुर्कीमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. आज, सोमवार, 9 डिसेंबर, तुर्कीच्या इस्पार्टा प्रांतातील केसिबोरलू जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. 

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरला हा अपघात झाला तेव्हा ते लष्कराच्या प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते. यावेळी ते हेलिकॉप्टर दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडकले, त्यामुळे ते क्रॅश झाले. मात्र, दुसऱ्या हेलिकॉप्टरचे लँडिंग यशस्वी झाले. अपघातानंतर हेलिकॉप्टर आगीचा गोळा बनून जळू लागला.

तुर्कियेच्या इस्पार्टा प्रांतातील केसिबोर्लू जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याने सहा सैनिकांचा मृत्यू झाला. या अपघातात 5 जवानांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जवान गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. दोन हेलिकॉप्टरची टक्कर कशामुळे झाली आणि एक हेलिकॉप्टर कसे कोसळले, तर दुसरे सुखरूप कसे उतरले याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Edited By - Priya Dixit