शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

प्रयोगशाळेत बदलले फुलपाखरांचे रंग

वॉशिंग्टन- रंगीबेरंगी फुलपाखरे पाहिली की निसर्गाची कला पाहून मन थक्क होत असते. मात्र आता माणसानेही यामध्ये काही वेगळे रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे.
 
अमेरिकेतील संशोधकांनी प्रयोगशाळेत फुलपाखरांच्या पंखावरील रंग बदलण्यात यश मिळवले आहे. त्यांनी फुलपाखरांमधील अशा जनुकाचा शोध घेतला आहे ज्याच्या सहाय्याने त्यांच्या पंखांवरील रंग नैसर्गिकरित्या निश्चित होत असतात. या रंगांच्या पद्धतीत बदल करण्यात संशोधकांना यश मिळाले.
 
असाच प्रयोग यापूर्वी जपानी संशोधकांनीही केला होता. त्यांनही जीन एडिटिंगच्या सहाय्याने फुलांचे रंग बदलण्यात यश मिळवले होते. आता या अमेरिकन संशोधकांनी फुलपाखरांचे रंग बदलले आहेत. पनामामधील स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्सिटट्यूटच्या ओवेन मॅकमिलन यांनी याबाबतची माहिती दिली.