testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर चीन सरकार देणार अर्थसाहाय्य

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनने जन्मदर वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी दुसर्‍या अपत्याच्या जन्मानंतर आर्थिक साहाय्य व जन्म पुरस्कार देण्याच्या योजनेवर विचार सुरू केला आहे. नॅशनल हेल्थ अॅन्ड फॅमिली प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष वांग पेईयान यांनी एका सामाजिक संमेलनात बोलताना सरकार्चया या संभावित निर्णयाबद्दल खुलासा केला. गेली चार दशके वन चाईल्ड पॉलिसीमुळे चीनमध्ये निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटावर मात करण्यासाठी चिनी सरकारने जोडप्यांना दुसरे मूल जन्मास घालण्याची परवानगी दिली. त्यानुसार 2016 मध्ये चीनमध्ये 1.78 कोटी मुले जन्माला आली. हे प्रमाण गेल्या वीस वर्षातील सर्वाधिक आहे.
त्यानंतर झालेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की चीनमधील 60 टक्के जोडपी आर्थिक परिस्थिती नसल्याने दुसरे मूल जन्माला घालण्याचा विचार करू शकत नाहीत. तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन अशा जोडप्यांना आर्थिक साहाय्य व पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यासांबंधी विचार सुरू केला आहे. जन्मपुरस्कार व अनुदान योजनेखाली हा निर्णय घेतला जात आहे.


यावर अधिक वाचा :