चीनची तैवान मध्ये पुन्हा घुसखोरी,लढाऊ विमानांनी सीमेचे उल्लंघन केले
चीन आपल्या विस्तारवादी धोरणापासून परावृत्त होत नाही. त्याच्या या कृत्याने शेजारी देश त्रासले आहेत. आपल्या शेजारील देशांव अधिकार सांगण्याचा चीनचा अयशस्वी प्रयत्न अजूनही सुरू आहे.चीनने एका महिन्यात 12 वेळा हे कृत्य केले आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (पीएलएएएफ) च्या लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा तैवान सीमेचे उल्लंघन केले आहे.
तैवानच्या वृत्तानुसार, या महिन्यात चिनी लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत 6 वेळा प्रवेश केला आहे. चिनी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी 2,3,4,7 आणि 8 जुलै रोजी तैवान सीमेवर घुसखोरी केली.