Widgets Magazine
Widgets Magazine

टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात ८ जण ठार

टेक्सास| Last Modified सोमवार, 11 सप्टेंबर 2017 (12:40 IST)
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील प्लानोमध्ये
एका घरात अज्ञात
हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात
Widgets Magazine
आठजण ठार झाल्याचं वृत्त
आहे. मृतांमध्ये संशयित हल्लेखोराचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये .

उत्तर टेक्सासमध्ये रविवारी रात्री आठच्या सुमारास हा गोळीबार झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी लगेचच गोळीबाराला प्रत्युत्तर दिले असे प्लानो पोलीस दलाचे प्रवक्ते डेव्हीड टिल्ये यांनी सांगितले.

पहिला अधिकारी घरात घुसल्यानंतर त्याचा संशियत हल्लेखोराबरोबर सामना झाला. अधिका-याने केलेल्या गोळीबारात संशयित हल्लेखोर ठार झाला.यात दोन पोलीस
देखील जखमी झाले आहेत.हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची तसेच हल्लेखोराची ओळख पटलेली नाही. हल्ल्यामागचे नेमके कारण काय आहे ? ते ही अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :