शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पळपुट्या विजय माल्याला बघून लोकांनी लावला 'चोर-चोर' चा नारा

ओव्हल- वर्ल्डकपच्या रविवारी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या झालेला सामना बघण्यासाठी पळपुट्या मद्य व्यवसायी विजय माल्या लंडनच्या ओव्हल ग्राउंडवर पोहचला. सामना संपल्यानंतर स्टेडियमच्या बाहेर निघाल्यावर माल्याला गर्दीत फसला आणि लोकं जोरजोराने चोर चोर ओरडू लागले. माल्यासोबत त्याची आई देखील होती. गर्दीत अडकलेल्या माल्याने पत्रकारांना म्हटले की मी केवळ सामना बघण्यासाठी आलो आहेत. माझ्या आईला कोणत्याही प्रकाराचे नुकसान होता कामा नये.
 
माल्याने हे देखील म्हटले की आता माझी आई देखील मला चोर समजू लागली आहे. माल्याविरुद्ध फ्रॉड, मनीलॉन्ड्रिंग, फेमा उल्लंघनाचे आरोप आहेत. माल्या मागील वर्षी देखील सप्टेंबरमध्ये भारत-इंग्लंडचा सामाना बघण्यासाठी स्टेडियम पोहचला होता. तेव्हा देखील टीम इंडियाच्या काही समर्थकांनी त्याला बघून चोर-चोर असे नारे लावले होते.
 
माल्यावर भारतीय बँकांचे 9000 कोटींचे कर्ज आहे. माल्याने कंपनी किंगफिशर एअरलाइंसच्या बँकेहून लोन घेतले होते. माल्याने मार्च 2016 मध्ये लंडनला पळ काढलं होतं. मुंबईच्या विशेष कोर्टाने त्याला पळपुट्या घोषित केले आहेत. त्याच देश-परदेशातील अनेक प्रॉपर्टीज अटॅच करण्यात आल्या आहेत. लंडनच्या वेस्टमिन्सटर कोर्टात माल्याच्या प्रत्यावर्तनचं प्रकरण सुरू आहे.