बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (09:47 IST)

'जर हिंमत असेल तर सरकार पाडा'. आम्ही सत्तेला डसणारे मुंगळे नाहीत

'तारीख पे तारीख देतायत, देवू देत. अनेकजण स्वप्नं पाहयातय सरकारचे पाडण्याचे पण आताही आवाहन करतो, 'जर हिंमत असेल तर सरकार पाडा'. आम्ही सत्तेला डसणारे मुंगळे नाहीत,' असं म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणाला सुरूवात केली. 
 
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे महत्वाचे मुद्दे 
- महाराष्ट्र ही वाघाची औलाद आहे, आडवं आल्यावर काय होते. याचा इतिहास आहे व भविष्यातही समजेल
- काही जणांना गुरेढो-याची लसं द्यावी लागतात
- बेडूक आणि दोन पिलं सद्या इकडून तिकडं उड्या मारतात
- मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून संयमानं बोलण्याचा प्रयत्न करतो.
- खोटे आरोप, आळ घेतले जातायत. पण आम्ही शांत राहिलो
- टक्कर देण्याची खूमखूमी असेल त्यांनी प्रयत्न करावा
- मंदिरे उघडत नाही म्हणून हिंदुत्वाबद्दल विचारतायत. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा शेपट्या घालून बिळ्या बसली होती
- देवळात घंटा बडवणारा नव्हे तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदूत्व हवा
- कोरोना घालवण्यासाठी थाळ्या बडवायला सांगणारे हिंदुत्व का
- गोव्यात गोहत्या बंदी का नाही ?
- जेवढं लक्ष पक्षावर देताय, तेवढं लक्ष देशावर द्या
 - आपल्या हक्काचे ३८ हजार कोटी केंद्राकडं बाकी आहे, ते देतच नाहीयत.
- जीएसटी पद्धत फसली आहे. पीएमनी चूक मान्य करून जीएसटी रद्द करून जुन्या करप्रणालीकडं जायला हवं 
- इंग्रजांसारखी मस्ती भाजपकडे
- शिवसेनेसोबतही डाव खेळला गेला होता. 
- मोहन भागवतांना राष्ट्रपती करण्याची मागणी आम्ही केली होती
- संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार कसं चालतात ? 
- कोरोनाची लस बिहारमध्ये फुकट देणार आणि आम्ही काय बांग्लादेश मध्ये आहोत का
- दानवे बाप तुमचा असेल, माझा बाप इकडं आहे. भाडोत्री बाप स्विकारणार नाही. आहेराचे पाकिट घेवून पळणारे तुमचे बाप आहेत
- दहा तोंडी रावण महाराष्ट्रावर आलाय. एक म्हणतोय, महाराष्ट्र हे पाकव्याप्त काश्मीर आहे. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईवर बोलायचं
 
शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा साधेपणाने साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाच्या हॉलमध्ये दसरा मेळावा साजरा होणार आहे. १९६६ साली शिवसेनेचा दसरा मेळावा पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा गेल्या पाच दशकांपासून साजरा होत आहे. ३० ऑक्टोबर १९६६ साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. तेव्हापासून या दसरा मेळाव्याची परंपरा आहे. 
 
एकच पक्ष एकच मैदान असा या दसरा मेळाव्याचं वेगळेपणं आहे. हे वेगळेपण शिवसेनेने जपलं आहे. फक्त शिवसैनिकच नाहीत तर संपूर्ण जनता 'दसरा मेळावा' पाहण्यास आणि खास करून यामधील भाषण ऐकण्यास उत्सुक असते.