शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , गुरूवार, 26 ऑक्टोबर 2017 (10:52 IST)

कँन्सरवर 3D उपचार घेणारी डेबी हॉकिन्स ठरली जगातील पहिली रुग्ण

वैज्ञानिक प्रगतीमुळे आजकाल प्रत्येक आजारासाठी उपचार उपलब्ध आहेत. वैद्यकिय क्षेत्रात क्रांती झाल्याने अनेक असाधारण रोगांवर उपचार उपल्बध होऊ लागले आहेत. शिवाय अनेक उपचार पद्धतींमध्ये आधुनिक तंत्रज्ञानांचाही वापर होऊ लागल्याने रुग्ण आजारातून बरा झाल्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करू लागतो.
 
असंच एक महत्त्वाचे प्रत्यारोपण ब्रिटनमध्ये झाले आहे. रुग्णाला जबड्याचा कॅन्सर झाल्यामुळे तो अधिक वाढू नये याकरता डॉक्टरांनी जबडा प्रत्यारोपण केले. पण नुसतेच जबड्याचे प्रत्यारोपण न करता त्यासाठी थ्रीडी प्रिंटीग इम्प्लेमेंशनची पद्धत वापरण्यात आली. त्यामुळे रुग्णाला पूर्वीसारखाच नैसर्गिक चेहरा प्राप्त झाला. थ्रीडी प्रत्यारोपण करणारी डेबिस ही जगातील पहिली रुग्ण ठरली आहे.
 
ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या डेबी हॉकिन्स या महिलेला जबड्याच्या खालच्या बाजूस कॅन्सर झाला होता. जबड्यावरील कॅन्सर दूर करणे हे कठीण काम होतं. एका प्रसिद्ध एनएचएस टीमने थ्रीडी प्रिंटेड टाइटेनियम प्रत्यारोपण केले. जबड्याला नैसर्गिक आकार येण्यासाठी त्यांनी नेहमीच्या बोर्न ग्राफ्ट्स पद्धतीचा वापर केला. जेणेकरून जबड्याला नैसर्गिक आकार प्राप्त होईल. यासाठी रुग्णाच्या शरीरातील एका अवयवाच्या हाडांचा वापर करत त्याला मेटल प्लेट्सला जोडून हे प्रत्यारोपण करण्यात आलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
 
खरंतर जबड्याला कॅन्सर झाल्याने त्याचा परिणाम दातांवरही होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रत्यारोपणावेळी दातांचा अडसर निर्माण झाला. पण मोरिस्टॉन रुग्णालयातील डॉक्टरांनी जबड्याचे व्यवस्थित सिटीस्कॅन केले. सिटीस्कॅनच्या रिर्पोट्सनुसार त्यांनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.