गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , शनिवार, 5 मे 2018 (17:10 IST)

दीपा आंबेकर भारतीय वंशाच्या न्यूयॉर्क कोर्टाच्या जज

मराठमोळ्या दीपा आंबेकर यांची न्यूयॉर्क शहरातील क्रिमीनल कोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. यामुळे मराठी माणसांची मान अभिमानाने उंचावली आहे. आंबेकर न्यूयॉर्कमधील पहिल्याच महाराष्ट्रीय तर तिसऱ्या भारतीय स्त्री न्यायाधीश ठरल्या आहेत.
 
अन आर्बर येथील मिशिगन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर निम्न आर्थिक स्तरातील लोकवस्तीच्या शाळेत त्या शिकवत होत्या. अॅलक्सेन्चर या सल्लागार कंपनीत नोकरी करताना पगारातील पैसे वाचवून त्यांनी रूटगर्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ या संस्थेतून विधि शाखेतली पदवी घेतली. लॉ फर्ममधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून तब्बल ७० टक्के कमी वेतन स्वीकारत त्यांनी लीगल एड्स सोसायटीसाठी वकील म्हणून काम केले. या माध्यमातून त्यांनी लीगल एड्स सोसायटीच्या माध्यमातून दोन हजार गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यात मदत केली. गरीब लोकांचे खटले त्यांनी विनाशुल्क लढवले. आठ वर्षे सरकारी वकील म्हणूनही काम केले आहे.