गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (17:14 IST)

‘कोर्टात डोनाल्ड ट्रंप अगदी मख्ख चेहऱ्याने वावरत होते...’

डोनाल्ड ट्रंप यांचा दिवस ऐतिहासिक आणि नाट्यमय होता. मात्र त्यांच्यावर असणाऱ्या आरोपांबद्दल जेव्हा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा या आरोपामुळे लोकांचं अगदी मतपरिवर्तन होईल, असं वाटत नाही.
 
न्यूयॉर्क शहरात त्यांच्यावर आरोप निश्चित केले जातील हे दोन आठवड्यांपूर्वीच निश्चित झालं होतं. त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले गेले. नक्की कोणते आरोप लावलेत हे जाणून घ्यायची ट्रंप यांच्यासह सगळ्यांनाच उत्सुकता होती.मात्र असं लक्षात आलं की त्यांच्याविरुद्धच्या आरोपांची आधीच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
34 पानी आरोपपत्रात प्रौढ अभिनेत्री स्ट्रॉमी डॅनिअल्सला पैसे देण्याचा आरोप आहे. त्यांच्यावर कोणताच कट रचल्याचा आरोप नाही. तिथल्या ज्युरीने कोणतेही नवे आरोप लावलेले नाही. कोणतीही वेगळी केस नाही.
 
मंगळवारी (4 एप्रिल) जेव्हा ट्रंप झोपेतून उठले तेव्हा सगळं नियोजित होतं. ही केस म्हणजे मतदारांना भूलवण्याचा प्रकार आहे ही बाब फक्त त्यातली नवीन होती.
 
यावरून गेल्या काही दिवसात ज्या युद्धाची पार्श्वभूमी तयार केली जात होती ते युद्ध आता आणखी तीव्र होण्याची चिन्हं होती. ट्रंप यांच्यावर आरोपनिश्चिती होणार हे लक्षात आल्यावर रिपब्लिकन पक्षाचे लोक एकजुटीने त्यांच्यामागे उभे होते.
 
उटाहचे सिनेटर मीट रोमने यांनी ट्रंप यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्यावेळी दोनदा त्यांच्याविरोधात मत दिलं होतं. त्यांनी एक निवेदन जारी केलं. “ट्रंप यांच्या वकिलांनी राजकीय कटाचा भाग म्हणून ट्रंप यांना कोर्टात खेचलं आहे. त्यांच्या या कृतीमुळे विरोधकांवर असे गुन्हे दाखल करण्याचा प्रघात निर्माण होईल आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेची लोकांच्या मनातील प्रतिमा मलीन होईल,” असं ते म्हणाले.
 
डेमोक्रॅट्स मात्र जो बायडन यांचा आदेश मानून या खटल्याबाबत काहीही बोलणार नाही. सध्या ते कोणताही वाद अंगावर घेणार नाही आणि माजी राष्ट्राध्यक्षांची प्रतिमा कशी मलीन होत राहील याची दक्षता घेतील.
 
कोर्टात ट्रंप अगदी मख्ख चेहऱ्याने वावरत होते. जेव्हा निर्दोषत्त्व सिद्ध करायची वेळ आली तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत. मात्र सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी या प्रकरणाचा मला फायदाच कसा होईल हे ठसवण्यात किंवा तसा आभास निर्माण करण्यात व्यग्र होते.
 
त्यांनी ब्रॅग यांच्यावर न्यूयॉर्क येथील वकिलांच्या टीमवर सातत्याने ताशेरे ओढले हे प्रकार इतकं वाढलं की न्यायाधीशांना ट्रंप यांना सावध करावं लागलं.
 
ट्रंप यांनी न्यायाधीशांच्या नि:पक्षपतीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ही केस मॅनहटन ऐवजी स्टेटन आयलँडला हलवण्याची विनंती केली कारण तिथले ज्युरी बहुतांशी ट्रंप यांचे समर्थक आहेत.
 
केस उभी राहण्याआधी त्यांच्या वकिलांना आरोपपत्र खारिज करण्याबाबतची कागदपत्रं सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
ट्रंप यांच्या मते या खटल्यात आताच्या घडीलाच काही अर्थ नाही. मात्र हे प्रकरण फक्त न्यूयॉर्कमध्येच थांबणारं नाही. विशेष सरकारी वकील आणि जॉर्जियाचे डिस्ट्रिक्ट अटर्नी या प्रकरणात एक स्वतंत्र चौकशी करत आहेत. ते त्यांचं स्वतंत्र आरोपपत्र दाखल करू शकतात.
 
अमेरिकेत अशा प्रकारचं कायदेशीर नाट्य अनेकवेळा झालं आहे. त्यात मोठ्या प्रमाणात राजकीय हितसंबंध गुंतले होते.
 
अमेरिकेच्या नागरिकांना आता दोन्ही बघायला मिळत आहे. कदाचित पुढे आणखी नाट्य बघायला मिळेल. येणाऱ्या काळात एक तीव्र कायदेशीर लढाई, त्याचे परिणाम बघायला मिळणार आहेत, कारण एक माजी राष्ट्राध्यक्षच त्यात अडकले आहेत.
 
अमेरिकेच्या या माजी राष्ट्राध्यक्षांना अशा राजकीय लढाया प्रतिष्ठेची करण्याची सवय गेल्या आठ वर्षांपासून लागली आहे आणि अजूनही तेच सुरू आहे.
 
न्यायाधीशांनी अधिक नाट्य टाळण्यासाठी ट्रंप यांच्या कारवाईचं व्हीडिओ शूटिंग करण्यास परवानगी नाकारली. कोर्टरुमच्या बाहेर मात्र त्यांच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रसारमाध्यमांचीही गर्दी होतीच, बाकी सर्कस चालू होतीच.
Published By- Priya Dixit