1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (16:47 IST)

ग्राहकाच्या चपळतेमुळे चोरटयांनी 8 सेकंदात पळ काढला

Due to the agility of the customer
अमेरिकेतून एक व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना युमा, अॅरिझोना, अमेरिकेची आहे. मास्क घातलेले दोन लोक हातात बंदूक घेऊन गॅस स्टेशनमध्ये प्रवेश करताच, त्यापैकी एकाने कॅशियरकडे बंदूक दाखवली, तर एक ग्राहक जवळच उभा होता.

ते यूएसमरीन मध्ये सेवारत होते. त्यांनी तत्काळ कारवाई करत चपळतेने चोरट्यांकडील बंदूक हिसकावून घेतली. त्याने इतक्या वेगाने हल्ला केला की चोर खाली पडला.
 
त्यानंतर दोन्ही चोरटे घाबरून पळून गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे की या घटनाक्रमात केवळ 8 सेकंदाचा वेळ लागला. या ग्राहकाचे सर्वत्र कौतुक होत आहे